Premium

तुमच्या मित्रांचे ‘हे’ स्वभाव आयुष्य वाढवण्यासाठी ठरतात जादुई फंडा; पण ‘ही’ एक बाजू सांभाळाच!

How Friends Add Years In Life: मागील आठ वर्षांच्या अभ्यासादरम्यान, सहभागींचे तीन वेळा सर्वेक्षण केले गेले, ज्यात असे दिसून आले की ज्यांची मैत्री घट्ट होती त्यांच्या मृत्यूची शक्यता २४ टक्के कमी होती.

Your Friends Attitude Can Affect Mental And Physical Body Status Like Magic Pill How To Spot Negative People In Life Watch Survey
मैत्रीला पण एक नकारात्मक बाजू आहे (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

How Friends Help In Physical Mental Peace: एपिडेमियोलॉजी अँड सायकियाट्रिक सायन्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की वृद्ध व्यक्तींमधील मैत्री ही शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर घटक ठरू शकते. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक व अभ्यासाचे सह-लेखक विल्यम चोपिक, यांच्या माहितीनुसार, यापूर्वीच्या संशोधनात मैत्री आणि विशिष्ट आरोग्य फायदे यांच्यातील संबंध अधोरेखित केले गेले होते पण हा अभ्यास आजपर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वसमावेशक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चोपिक आणि सहकाऱ्यांनी सांगितले की घट्ट मैत्री असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात काही वर्षांची भर पडू शकते. आठ वर्षांच्या अभ्यासादरम्यान, सहभागींनी तीन वेळा सर्वेक्षण केले, ज्यात असे दिसून आले की ज्यांची मैत्री घट्ट होती त्यांच्या मृत्यूची शक्यता २४ टक्के कमी होती. ज्यांच्याकडे चांगले व जिव्हाळ्याचे मित्र असतात त्यांचे व्यायाम करण्याचे प्रमाण ९ टक्के जास्त असते. नैराश्याचा अनुभव येण्याचा धोका १७ टक्क्यांनी कमी तर पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता १९ टक्क्यांनी कमी होते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Your friends attitude can affect mental and physical body status like magic pill how to spot negative people in life watch survey svs

First published on: 06-12-2023 at 17:16 IST
Next Story
Winter Blues : हिवाळ्यात उदासपणा का जाणवतो? ‘या’ गोष्टी असू शकतात कारणीभूत; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात