scorecardresearch

Premium

तुमचे बाथरुम अत्यंत खराब झाले आहे का? स्वयंपाकघरातील ‘हा पांढरा पदार्थ वापरून करा सफाई

जर तुम्हाला तुमचे बाथरुम साफ ठेवायचे असेल आणि यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील, तर घरात असलेला हा पदार्थ वापरून पाहा.चमकावा

how to clean bathroom
वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी तुरटी वापरा (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

How To Clean Bathroom: तुम्ही घरात कितीही साफसफाई केली तरी जोपर्यंत तुमचे बाथरूम स्वच्छ होत नाही, तोपर्यंत तुम्हाला साफसफाई झाल्याचे समजत नाही. इतकेच नाही तर घरात एखादा पाहुणा आल्यावर अस्वच्छ बाथरूम पाहतो तर त्यांना तुम्ही अस्वच्छ आहात असा समज होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे बाथरुम साफ ठेवायचे असेल आणि यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील, तर घरात पडून असलेली थोडी तुरटी वापरून तुम्ही हे करू शकता. आपले बाथरुम आणि स्वच्छ करू शकता.

वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी तुरटी वापरा
वॉश बेसिनमध्ये अनेकदा पिवळे ठिपके तयार होतात, जे खूप घाणेरडे दिसतात. अशा परिस्थितीत थोडी तुरटी घ्या आणि एका भांड्यात पाण्यात मिसळा, २० मिनिटे सोडा. तुरटी पाण्यात विरघळली की, तुरटीच्या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा टाका आणि वॉश बेसिनमध्ये शिंपडा आणि ब्रशच्या मदतीने घासून घ्या आणि तुम्हाला दिसेल की वॉश बेसिन नवीनसारखे चमकू लागेल.

chemical-free lipstick DIY
Beauty hack : ओठांवर लावा नैसर्गिक, केमिकल-फ्री लिपस्टिक! घरातील केवळ ‘हा’ पदार्थ वापरून बनवून पाहा…
Which oil is best for cooking
Oil For Cooking : स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
holding pee for long time is harmful
तुम्ही बराच काळ लघवी रोखून ठेवली तर आरोग्याला होईल धोका? होऊ शकतात हे आजार
Breakfast Recipe
Breakfast Recipe : फक्त १ कप रव्यापासून बनवा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ, पोटभर नाश्ता होईल; रेसिपी लगेच नोट करा

बाथरूमचे नळ कसे स्वच्छ करावे
बाथरूमच्या नळांवर अनेकदा घाणेरड्या पाण्याच्या डाग किंवा गंज असतो. अशा परिस्थितीत ते स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात तुरटी पावडर टाका. त्यात दोन चमचे व्हिनेगर घालून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट नळावर २० मिनिटे राहू द्या, त्यानंतर स्क्रब किंवा ब्रशच्या मदतीने टॅप स्वच्छ करा.

अशा प्रकारे सांडपाण्याची लाईन किंवा नळ साफ करा
बाथरूमची नळ किंवा सांडपाण्याची लाईन साफ करण्यासाठीही तुरटी खूप प्रभावी आहे. यासाठी एक वाटी गरम पाणी घ्या, त्यात दोन चमचे तुरटी पावडर मिसळा, त्यात अर्धा लिंबाचा रस घाला आणि बाथरूमच्या नळाभोवती आणि आत टाका. १० मिनिटे असेच राहू द्या, नंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा आणि पाणी घालून सांडपाण्याची लाईन देखील स्वच्छ करा.

टाइल्स कसे स्वच्छ करावे
तुरटीने फरशा स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात तुरटी पावडर मिसळा आणि हळू हळू तुमच्या टाइल्सवर लावा आणि स्वच्छ घासून घ्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to clean bathroom alum how to clean bathroom fast snk

First published on: 10-12-2023 at 02:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×