डोळे हे आपल्या भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम असतात. त्यामुळेच अनेकदा डोळे बोलतात असा शब्दप्रयोगही आपण सहज वापरतो. आपल्या मनात आणि शरीरात सुरु असणारी खळबळ आपल्या डोळ्यातून व्यक्त होत असते. हेच डोळे आपले सौंदर्य खुलवत असतात. दिवसभर लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहून डोळे कोरडे होणे, त्यांची आग होणे, लाल होणे, पाणी येणे अशा तक्रारी उद्भवतात. त्या दूर करण्यासाठी तसेच डोळे सुंदर दिसण्यासाठी त्याला काजळ, आयलायनर हे लावणे ठिक आहे, पण ते आतूनच सुंदर दिसले तर? यासाठीच आज आपण घरच्या घरी करता येतील अशा काही सोप्या टिप्स पाहूयात…

१. कोरफड

Health Benefits of Castor Oil
रोज एक चमचा एरंडेल तेलाच्या सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डाॅक्टरांकडून जाणून घ्या…
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How To Make Home Made Raw Banana Fry Or Maharastrian Style Kachya Kelyache Kaap Note Recipe
१० मिनिटांत करा ‘कच्च्या केळ्यांचे तिखट काप’; ‘ही’ चटपटीत रेसिपी लगेच नोट करा…
Use This Epsom Salt Looking Like Rice For Flower Plants Anant Mogra Jaswandi
Video: तांदळासारखी दिसणारी ‘ही’ वस्तू वापरून फुलवा अनंताच्या रोपाची शोभा; भरपूर कळ्यांनी सजेल कुंडी

आपण दिवसभर डोळ्यांचा वापर करत असल्याने ते थकतात. त्यामुळे डोळ्याचे सौंदर्य कमी होते. अशा थकलेल्या डोळ्यांसाठी कोरफड अतिशय उपयुक्त ठरते. कोरफडीच्या रसाचे आईस क्यूब करुन ते डोळ्यांखाली ठेवावेत. त्याचा डोळ्यांचे सौंदर्य वाढण्यास फायदा होतो.

२. काकडी

काकडीमध्ये वाढलेले वय दिसू नये यासाठी उपयुक्त असणारे घटक असतात. त्यामुळे वाढते वय लपवले जाते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी दिसतात. यासाठी काकडीच्या चकत्या डोळ्यांवर ठेवा, बराच वेळ ठेवल्याने डोळ्यांना गार वाटते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

३. बटाटा

डोळ्याखाली असलेली सूज आणि डार्क सर्कल कमी होण्यासाठी बटाटा अतिशय उपयुक्त असतो. बटाट्यात असणारे इस्ट्रोजन डोळ्यांची जळजळ कमी करण्यास मदत करते. यासाठी बटाट्याचा रस काढून तो १५ मिनिटे डोळ्यांना लावून ठेवावा. यामुळे डोळ्यांखाली असणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यासही मदत होते.

४. टोमॅटो

डोळ्यांखालच्या त्वचेचा रंग सुधारण्यास टोमॅटोचा चांगला उपयोग होतो. टोमॅटोच्या रसात लिंबू आणि हळद टाकून हे मिश्रण डोळ्यांखाली लावून ठेवावे. २० मिनिटांनी ते साध्या पाण्याने धुवून टाकावे. त्यानंतर तुम्हाला अतिशय चांगला फरक दिसून येईल.

५. टी बॅग

डोळ्यांखाली असलेला थकवा कमी करण्यासाठी टी बॅग अतिशय उपयुक्त ठरतात. टी बॅग वापरुन झाल्यानंतर त्या गार करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवाव्यात. या गार झालेल्या बॅग्ज काढून १५ मिनिटांसाठी डोळ्यावर ठेवाव्यात. यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते.