Water Tank Cooling Tips in Summer: उन्हाळा सुरू झाला की, प्रत्येकाला आठवण येते ती माठातील गार पाण्याची. फ्रिजपेक्षाही माठातील पाणी यावेळेत अतिशय फायदेशीर असते. कारण माठातील गार पाण्यामुळे शरीराला कोणताही त्रास होत नाही. तसेच गरमीमध्ये माठातील पाणी प्यायल्याने शरीराला फायदा होतो. थंड पाणी तुम्हाला कडक उन्हापासून आराम मिळण्यास मदत करते. सध्या उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की घरी पोहोचता पोहोचता, घामाची आंघोळ झालेली असते. त्यामुळे पुन्हा स्वच्छ आंघोळ केल्याशिवाय करमत नाही.

अनेकजण थंड पाण्याने आंघोळ करत करतात. पण कडक उन्हामुळे छतावरील पाण्याच्या टाकीतील पाणी गरम होतं आणि नळाला किंवा शॉवरला सुद्धा गरम पाणी येते. आपण पिण्यासाठी लागणारं पाणी माठ किंवा फ्रिजच्या मदतीने थंड करु शकतो. पण छतावरील पाण्याच्या टाकीतील पाणी थंड कसं करणार? पण आता मात्र चिंता करु नका, कारण जबरदस्त असा जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. ज्याच्यामदतीने तुम्हाला छतावरील पाण्याच्या टाकीतील पाणी थंड करता येईल आणि आंघोळ करताना थंड पाण्याचा आनंद घेता येईल. गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. दरम्यान असाच एक जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
How To Save Electricity Bill Through Fridge
उन्हाळ्यात फ्रिजमुळे विजेचं बिल खूप येतंय? ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; पैशांची होईल मोठी बचत, व्हिडिओ एकदा पाहाच
Viral Video avoid heat while cooking Man Desi Jugaad Works Watch This Amazing Idea And Funny technique
स्वयंपाकघरात थंडगार हवेसाठी पट्ठ्याने केला ‘असा’ जुगाड; टेबलावर ठेवला पंखा अन्… पाहा VIDEO

(हे ही वाचा: उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा)

नेमकं काय करायचं? 

व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने दाखवल्यानुसार, थर्माकॉल शीट्स घेऊन टाकीभोवती लावल्या आहेत. आणि त्या चिकटपट्टीने टाकीला चिकटविल्या आहेत. यासाठी जाड थर्माकॉल शीट्स घ्या. पातळ घेतले तर ते तूटून जातील, असे महिलेने सांगितले आहे. आता यानंतर गोणपाट घेऊन महिलेने थर्माकॉल शीट्सवर संपूर्ण झाकून घेतलं. गोणपाट उडू नये म्हणून महिलेने दोरीने किंवा खराब वायरने बांधून घेतलं आहे. टाकीच्या वरच्या भागालाही थर्माकॉल शीट्सवर गोणपाट लावून बांधून घेतलं आहे आणि यावर एखादं वजन ठेवण्याचा सल्ला महिलेने दिला आहे. त्यामुळे ते हवेने उडणार नाही आणि त्यानंतर महिलेने या टाकीवर पाणी शिंपडलं आहे. असं केल्याने टाकीतील पाणी गरम होणार नाही, असं दावा महिलेने केला आहे.

येथे पाहा व्हिडिओ

Maa, Yeh Kaise Karun? या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)