kitchen Tips : आपल्या प्रत्येकाच्याच घरात तांदूळ असतात, मात्र हे तांदूळ तुम्ही कधी चालू गॅसवर टाकून पाहिले आहेत का? हो गॅसवर तांदूळ टाकल्याने काय फायदा होतो याचा जबरदस्त असा किचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.

भेसळयुक्त पदार्थांच्या सेवनाने आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते. अन्न पदार्थ दैनंदिन जीवनात आवश्यक असल्याने काही भामटे त्यात भेसळ करतात आणि अधिक नफा कमवण्यासाठी इतरांचा जीव धोक्यात घालतात. आता प्लास्टिकपासून तयार तांदळापासून सावध राहण्याची गरज आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी तांदळाची ओळख करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. याचबाबत आम्ही आज आपल्याला माहिती देणार आहोत. तांदळाचे काही दाणे हातात घेतल्याने तुम्हाला तांदूळ खरा आहे की खोटा हे कळू शकत नाही. त्यासाठी बासमती तांदूळ आणि प्लास्टिक तांदूळ यांची खरी माहिती असणं गरजेचं आहे. आपण घरच्या घरी काही सोप्या प्रक्रिया करून देखील याची सत्यता पडताळू शकता.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्हाला फक्त गॅस मध्यम आचेवर सुरु करुन त्यावर तांदळाचे थोडे दाणे टाकायचे आहेत. यानंतर २ मिनिटांत गॅस बंद करा. गॅस बर्नर थंड झाल्यावर त्यावर टाकलेले तांदूळ हातात घेऊन पाहा. तांदूळ दाबून जर त्याचा चुरा झाला तर ते प्लॅस्टिकचे नाहीत. पण जर तांदळाचा चुरा किंवा राख नाही झाली तर तो तांदूळ प्लॅस्टिकचा असण्याची शक्यता आहे. काही तांदूळ तुम्हाला जळताना, काळे होताना दिसले म्हणजे ते प्लॅस्टिकचे तांदूळ आहेत हे ओळखून जा.त्यामुळे विकतचे तांदूळ आणल्यानंतर तुम्हीही ही जुगाडू टीप नक्की फॉलो करा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री

टीप: ही टिप सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही माहिती प्रत्यक्ष अमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

@pritikhandarmarathivlogrec4493 या युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.