लिपस्टिक हा महिलांचा वीक पॉईंट म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मात्र सौंदर्यात भर घालणाऱ्या या लिपस्टिकमध्ये आरोग्याला घातक असणारे अनेक घटक असतात. यामध्ये शिसे, क्रोमियम यांसारखे घटक असतात. या रसायनांमुळे ओठांचा नैसर्गिक सौंदर्य हरवण्याची शक्यता असते. कारण लिपस्टिक लावलेली असताना आपण अगदी सहज खात पित असल्याने या अन्नपदार्थांबरोबर लिपस्टिक पोटात जाऊ शकते आणि अपाय होऊ शकतात. तेव्हा लिपस्टिक कशाप्रकारे हानिकारक असते समजून घेऊया…

रसायनांचा वापर

लिपस्टिक तयार करताना त्यामध्ये शिसे, क्रोमियम आणि मॅग्नेशियम यांचा वापर केलेला असतो. हे घटक आपल्या आरोग्यासाठी चांगली नसतात. यामुळे काही गंभीर आजार होऊ शकतात. त्याचबरोबर अवयवही निकामी होऊ शकतात. क्रोमियम दीर्घकाळ किडणीमध्ये राहिल्यास तुमच्या किडण्या खराब होऊ शकतात.

शिसे

शिसे हा धातू शरीराला हानिकारक असतो. त्यामुळे अनेक गंभीर तक्रारी उद्भवू शकतात.

खनिज तेल

ओठांना चमक यावी यासाठी लिपस्टिक तयार करताना त्यामध्ये खनिज तेलाचा वापर केलेला असतो. मात्र त्यामुळे ओठांमधली नैसर्गिक रंध्रे बंद होतात. याचा तुमच्या ओठांवर वाईट परिणाम होतो.

पेट्रोकेमिकल

लिपस्टिक तयार करण्यासाठी पेट्रोकेमिकलचा वापर केला जातो. हे शरीरासाठी अतिशय हानिकारक असते. कच्चे तेल आणि गॅस यांपासून याची निर्मिती केली जाते. यामुळे शरीराच्या अंत:स्रावाला इजा पोहोचण्याची शक्यता असते.

खाज येणे 

तुम्ही जर स्थानिक ब्रँडची लिपस्टिक वापरत असाल तर तुम्हाला खाज येण्याची शक्यता असते. त्यामुळे ओठ आणि त्यांच्या बाजूची त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेची लिपस्टिक वापरणे अतिशय आवश्यक आहे.