माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. या दिवशी व्रत करून भागवत शिवाची उपासना करतात. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकीचा एक दिवस. सर्व जगातील प्राणीमात्राकडून निर्माण झालेले तमोगुण महादेव प्राशन करतात, फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी ते विश्रांती घेतात. ही विश्रांती म्हणजे त्यांनी स्वत: साठी केलेली साधना होय. हा साधना काळ म्हणजे महाशिवरात्री अशी मान्यता आहे. त्रायोदशी आणि चर्तुदशी अशा दोनही एकभोक्त राहून उपवास करावा.

शिव हे तमोगुणाचे प्रतिक दैवत आहे. या महाशिवरात्रीच्या काळात तमोगुणांचा अंगिकार शिव करत नाहीत, त्यामुळे तमोगुणांचा प्रभाव वाढतो. ह्याचा प्रभाव आपल्यावर येवू नये म्हणून आणि शिवतत्व आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या काळात उपासनेत रहावे. ही उपासना तीन प्रकारे करावी. ‘उपवास’, ‘पुजा’ व ‘जागरण’.

रात्रीच्या चार प्रहराच्या काळात पूज्या कराव्यात. हे शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी उपवासात एक भोक्त व्हावे. पुजेत महादेवाच्या पिंडिवर अभिषेक करावा. बेल, पांढरी फुले, रुद्राक्ष अर्पण करावा. धोत्रा, आंबा यांची पत्री अर्पण करावी. भस्म अर्पण करावे. विश्वात वाढणा-या तमोगुणांपासून संरक्षण होण्याकरता ओम नम: शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. तसेच वेगवेगळ्या प्रहर काळात मंत्र साधना करावी.
महाशिवरात्री रात्री १२.०८ ते १२.५९ – ओम सोमाय नम: ,ओम शिवाय नम:

बारा राशींची मंत्र उपासना
मेष : ओम मणिमहेशा नम:
वृषभ : ओम निर्जेश्वर नम:

मिथुन : ओम बमलेहरी नम:
कर्म : ओम जगपालनकर्ता नम:
सिंह : ओम दक्षेश्वर नम:
कन्या : ओम अमयंकर नम:
तूळ : ओम नागाधिराज नम:
वृश्चिक : ओम अनदि नम:
धनू : ओम त्रिकालदर्शी नम:
मकर : ओम त्रिपुनाशक नम:
कुंभ : ओम बैजुनाथ नम:
मीन : ओम जागेश्वर नम:
– डॉ. योगेश मुळे