Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. खरं तर तुमच्यापैकी अनेक मुलांनी कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेऊन करिअर घडवावं याची निवड खूप पूर्वीच केली असणार. सर्वाधिक टक्के पडले की विज्ञान शाखा, त्याहून कमी गुण पडले की वाणिज्य आणि त्यातूनही सर्वात कमी गुण पडले की आर्ट शाखेत जावं असा चुकीचा समज आजही विद्यार्थी आणि पालक बाळगून असतात. पण, या व्यतिरिक्तही करिअरच्या अनेक वाटा विद्यार्थ्यांनी निवडायला शिकल्या पाहिजे. दहावीनंतर कॉलेज किंवा एखादं क्षेत्र निवडताना विद्यार्थी म्हणून तसेच पालक म्हणून काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे, त्यामुळे कॉलेज निवडताना कोणत्या गोष्टी विद्यार्थी म्हणून पाहाव्यात या बद्दल काही टीप्स.

– कॉलेज निवडताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तिथे आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हेही पाहावं. कॉलेजच्या पाच वर्षांत विद्यार्थी अनेक गोष्टी शिकत असतो त्यामुळे फक्त अभ्यासच नाही तर ज्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेक उपक्रम राबवत असतील अशा कॉलेजना प्राधान्य द्यावं. यात शिक्षणाव्यतिरिक्त खेळ, कला, समाजसेवा या विषयांत कॉलेजमध्ये कोणते उपक्रम राबवले जातात याविषयीही माहिती घ्यावी.

– कॉलेज निवडताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि त्याच्या पालकांनी त्या कॉलेजचं मुल्यांकन नक्की पाहावं. ‘नॅक’द्वारे naac प्रत्येक कॉलेजला मुल्यांकन देण्यात येतं, तिथलं शिक्षण, शिक्षक, शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेले उपक्रम यांसारख्य अन्य महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊनच त्या कॉलेजचं मुल्यांकन केलं जातं त्यामुळे ‘नॅक’द्वारे त्या कॉलेजला कोणतं मुल्यांकन दिलंय हे प्रवेश घेण्यापूर्वी पाहून घ्या. या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला इंटरनेटवर उपलब्ध होते.

– जर तुम्ही इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉस्पिटॅलिटी यांसारख्या शाखेचा विचार करत असाल तर संबधित कॉलेजनां एनबीएचं मानांकन मिळालं आहे की नाही तेही पाहा.