scorecardresearch

Premium

Haldi Kunku Gift Ideas: यंदा हळदी-कुंकवासाठी सुवासिनींना ‘वाण’ काय देणार? जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया

Makar Sankranti Haldi Kunku Vaan Ideas: मकर संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा वाण काय द्यावे, हा प्रश्न महिलांना पडलेला असतो. पण आता मात्र, टेंशन फ्री व्हा. आज आम्ही तुमच्याकरता खास जबरदस्त हळदीकुंकवाच्या वाणासाठी काही हटके आयडिया घेऊन आलोय.

Haldi Kunku Gift Ideas
मकर संक्रांती हळदी कुंकू वाण (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Gift Ideas for Makar Sankranti Haldi Kunku: नवीन वर्ष सुरु झाले की, सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे सर्व महिला वर्गांचा आवडता मकर संक्रांत. संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य देव जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटलं जातं. उत्तर भारतातील अनेक भागात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण खास करुन महिलांचा असतो. कारण यादिवशी सुगड पुजण्यापासून ते मकर संक्रांत सुरु झाल्यानंतर १५ दिवस हळदीकुंकवाचा कार्यक्रम सुरु होतो.

या दिवसात अनेक महिला आपल्या आजूबाजूच्या महिलांना बोलावून हळदीकुंकूवाचा (Haldi Kunku) कार्यक्रम आयोजित करतात. पण, हळदीकुंकूला देण्यात येणारे वाण (Vaan) नेमके काय द्यावे? असा अनेकदा महिलांना प्रश्न पडतो. वर्षानुवर्षे वाण देणाऱ्या महिलांना दरवर्षी यंदा वाण काय द्यावे, हा मोठा गहन प्रश्न पडलेला असतो. पण, काळजी करु नका आज आम्ही तुमच्याकरता खास असे जबरदस्त वाण देण्याची आयडिया घेऊन आलो आहोत. जे तुम्ही हळदी कुंकू वाण म्हणून सुवासिनींना देऊ शकता. चला तर जाणून घेऊया हळदीकुंकवाच्या वाणासाठी काही हटके पर्याय.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
breakfast from wheat flour
Breakfast Recipe : गव्हाच्या पिठापासून बनवा सकाळी झटपट नाश्ता, लगेच ही सोपी रेसिपी नोट करा
Womens Health is Weight Gain If Menstrual Bleeding Decreases
स्त्री आरोग्य : पाळीत रक्तस्त्राव कमी झाल्यास वजन वाढतं?
Gift Ideas for Makar Sankranti Haldi Kunku
Haldi Kunku Gift Ideas: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ १० भन्नाट आयडिया

हळदी-कुंकवाच्या वाणासाठी ‘हे’ आहेत काही हटके पर्याय

१. टिकल्याचे पाकीट (bindi) – हळदीकुंकवाच्या वाणासाठी तुम्ही महिलांना टिकल्याचे पाकीट देऊ शकता. आपल्याकडे येणाऱ्या बहुसंख्य महिलांना कोणत्या प्रकारच्या टिकल्या आवडतात, ते ठरवा आणि ते वाण म्हणून सुवासिनींना देऊ शकता.

२. आरसा – बाजारात सध्या बरेच वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर आरसे मिळतात. असाच एखादा आरसा तुम्ही सुवासिनींना वाण म्हणून देऊ शकता.

(हे ही वाचा : Makar Sankranti 2023 : मकर संक्रांती साजरी का केली जाते? या १० गोष्टींबाबत जाणून घ्या सविस्तर )

३. रेसिपी बुक – महिलांना स्वयंपाकासाठी मदत करणारे एखादं छानसं रेसिपी बुक वाण म्हणून देवू शकता. यामुळे सुवासिनींना आनंदी होणार.

४. कॅलेंडर – नवीन वर्ष सुरू झाल्याने हळदीकुंकवाच्या वाणासाठी वाण म्हणून तुम्ही कॅलेंडरही देऊ शकता.

५. मॉयश्चरायझर – सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे तुम्ही सुवासिनींना मॉयश्चरायझरचं छोटसं पॅकेटही वाण म्हणून देऊ शकता.

६. हातरूमाल (hanky) – हातरुमाल प्रत्येकजण वापरत असतो. म्हणून यंदाच्या हळदीकुंकवाच्या वाणासाठी तुम्ही हात रूमालही देऊ शकता.

७. तुळशीचं रोपटं – तुळस ही सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानली जाते. ज्या घरात तुळस आहे तिथे लक्ष्मीचाही वास असतो. त्यामुळे तुम्ही हळदीकुंकवाचं वाण म्हणून तुळशीचं रोप देऊ शकता.

(हे ही वाचा : Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण )

८. साडी कव्हर – सुवासिनींना साडी कव्हरमध्ये ठेवण्यासाठी वाण म्हणून तुम्ही साडी कव्हर देऊ शकता. हा एक चांगला पर्याय आहे.

९. घर साफ करायचे हँड डस्टर- घरातील साफसफाई करताना हँडग्लव्हज डस्टरचा वापर केला जातो. वाण म्हणून तुम्ही हे हँडग्लव्हज डस्टर सुवासिनींना देऊ शकता.

१०. कापडांच्या पिशव्या – प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे तुम्ही कापडाच्या पिशव्या हळदीकुंकवाच्या वाणासाठी वाण म्हणून देऊ शकता, हा चांगला पर्याय आहे.

अशाप्रकारे हळदीकुंकवाच्या वाणासाठी वरील भन्नाट आयडिया नक्कीच तुमच्या कामी येऊ शकतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Makarsankranti haldi kunku 2023 gift wan ideas pdb

First published on: 11-01-2023 at 07:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×