सामान्य वजन असणाऱया बालकांपेक्षा लठ्ठबालके जास्त मानसिक तणावात असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
जादा वजन असलेल्या बालकांमध्ये इतरांपेक्षा नैसर्गिकरित्या मानसिक ताण वाढविणाऱया संप्रेरकांची जलद निर्मिती होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. तणावामुळे शरिरामध्ये हायड्रोकॉर्टिझोन संप्रेरकाची निर्मिती होते. जेव्हा एखादा व्यक्ती जास्त काळ तणावात जगत असल्यास हायड्रोकॉर्टिझोन आणि तणावात भर पाडणारी संप्रेरके रक्तावरही परिणाम करणारी ठरतात. यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात असा दावा संशोधकांनी केला आहे.
नेदरलॅन्डमधील एका बालकांच्या रुग्णालयातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, “आम्हाला अगदी आठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लठ्ठबालकांमध्ये हायड्रोकॉर्टिझोने प्रमाण लक्षणीय आढळून आले हे आश्चर्य़कारक होते. लहानपणातच मानसिक तणावात वाढ होणे शरिरासाठी हानिकारक ठरणारे आहे.” असेही ते म्हणाले.