भारतात गेल्या महिन्यात लाँच करण्यात आलेला Poco X2 हा दमदार स्मार्टफोन ‘ओपन सेल’मध्ये खरेदी करण्याची संधी आहे. आतापर्यंत या स्मार्टफोनच्या खरेदीसाठी फ्लॅश सेलची वाट पाहावी लागायची, पण 18 मार्चपासून ते 22 मार्चपर्यंत हा फोन फ्लिपकार्टवर ओपन सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. Poco X2 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर असून हा फोन खास गेमिंगसाठी डिझाइन करण्यात आला आहे. दमदार प्रोसेसरशिवाय 6.67 इंच फुल एचडी+ रिअलिटी फ्लो 120Hz डिस्प्लेमुळे गेमिंगचा दर्जेदार अनुभव मिळतो. फोनच्या 3D कर्व्ड बॅक डिझाइनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. Poco X2 भारतात तीन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ओपन सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. जाणून घेऊया काय आहेत ऑफर्स :

फीचर्स आणि ऑफर्स :-
फ्लिपकार्टच्या बिग शॉपिंग डेज सेलअंतर्गत Poco X2 हा स्मार्टफोन एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे अथवा ईएमआयद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5% अनलिमिटेड कॅशबॅक आणि अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डवर 5% अतिरिक्त डिस्काउंटची ऑफर आहे. अँड्रॉइड 10 ओएसवर कार्यरत असलेल्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर Adreno 618 GPU आणि 8 जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आहे. पोकोचा हा स्मार्टफोन रिअर क्वॉड कॅमेरा सेटअपसोबत येतो. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आहे, तर 2 +8 +2 मेगापिक्सलचे अन्य तीन सेंसर आहेत. स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप असून यातील 20 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि आयआर ब्लास्टर आहे. या फोनला लेटेस्ट अँड्रॉइड 11 चे अपडेटही मिळेल असंही कंपनीने स्पष्ट केले आहे. याशिवाय 4,500mAh ची बॅटरी फोनमध्ये असून 68 मिनिटांमध्ये 0 ते 100 टक्के चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे. अ‍ॅटलांटिस ब्लू, मॅट्रिक्स पर्पल आणि फीनिक्स रेड या तीन रंगांचे पर्यायटलांटिस ब्लू, मॅट्रिक्स पर्पल आणि फीनिक्स रेड या तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल.

आणखी वाचा- Apple कडून सर्वात स्वस्त MacBook लाँच, सर्वात पॉवरफुल iPad ही आणला

किंमत :-
या फोनच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे. याशिवाय टॉप व्हेरिअंट म्हणजे 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे.