Rakshabandhan 2023 : रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ संपूर्ण आयुष्यभर बहिणीची रक्षा करणार असल्याचे वचन देतो. या सणामुळे बहीण-भावाच्या नात्यात सलोखा आणि स्नेह निर्माण होतो. प्रत्येक भावाने बहिणीसाठी या पाच गोष्टी करणे गरजेचे आहे. त्या गोष्टी कोणत्या ते आज आपण जाणून घेऊ या.

स्वाभिमान किती महत्त्वाचा आहे, हे सांगावे

प्रत्येक भावाने आपल्या बहिणीला स्वाभिमान किती महत्त्वाचा आहे, हे सांगावे. स्वाभिमानी व्यक्ती आयुष्यात खूप प्रगती करतात आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसमोर नेहमी खुलून येते.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

बहिणीला स्वातंत्र्य द्यावे

स्त्रियांना नेहमी स्वतंत्र जीवन जगायला आवडते. जर भाऊ बहिणीला स्वातंत्र्य देत असेल, तर बहीण नेहमी आनंदी राहील. एक समजूतदार भाऊ कधीही आपल्या बहिणीवर कोणतीही बंधने लादणार नाही; उलट तिला समजावेल आणि तिला सहकार्य करील.

हेही वाचा : ‘या’ तीन टिप्सच्या मदतीने ओळखा तुमचा खरा ‘सोलमेट’

बहिणीच्या निर्णयाचा आदर करावा

भारतात आजही अनेक ठिकाणी घरच्या स्त्रियांना स्वातंत्र्य नाही. त्या त्यांच्या मतांनुसार निर्णय घेऊ शकत नाहीत. पण, एक चांगला भाऊ नेहमी बहिणीच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करतो आणि तिला चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन देतो.

चांगले करिअर बनवता यावे यासाठी प्रोत्साहन द्यावे

प्रत्येकाच्या आयुष्यात करिअरला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक भावाने बहिणीला चांगले करिअर बनवता यावे यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे बहीण नेहमी आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल.

बहिणीबरोबर मित्राप्रमाणे वागावे

बहीण-भावाच्या या पवित्र नात्यात जर मैत्री असेल, तर ते नाते आणखी खुलते. प्रत्येक भावाने बहिणीचा चांगला मित्र बनायला हवे. त्यामुळे बहीण भावाबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करू शकते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)