नोटाबंदीनंतर नेटबॅंकिग आणि एटीएमचा वाढता वापर लक्षात घेऊन एसबीआयने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली आहे. देशभरातील ग्राहकांचे एटीएम वापरणे यामुळे सुरक्षित होणार आहे. यामध्ये बॅंकेने एटीएमला स्विच ऑन आणि स्विच ऑफ अशी सुविधा दिली आहे. एसबीआयचे बॅंक अॅप्लिकेशन एसबीआय क्वीकवर ही सुविधा उपलब्ध आहे.
यामध्ये खालील सुविधा देण्यात आल्या आहेत

१. एटीएम कार्ड स्विचऑन आणि स्विचऑफ करण्याशिवाय मिस्ड कॉल आणि आणि एसएमएस अॅप्लिकेशनही उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

२. ही सुविधा ग्राहक आपल्या घरातून आणि ऑफिसमधूनही वापरु शकतात. त्यामुळे एटीएम कार्ड वापरणे सोपे होणार आहे.

३. विविध सेवांसाठी हे अॅप्लिकेशन उपयुक्त असून सुरक्षेच्यादृष्टीनेही ते ग्राहकांसाठी फायदेशीर आहे.

४. ग्राहकांना हे अॅप्लिकेशन अॅंड्रॉईड, आयओएस आणि ब्लॅकबेरी या फोनवरुन वापरता येणार आहे. मात्र यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

५. आपण ज्या मोबाईल क्रमांकावर एसबीआय क्वीक डाऊनलोड करणार आहात तो मोबाईल क्रमांक बॅंकेच्या खात्याशी रजिस्टर असायला हवा.

६. या सुविधेची नोंदणी पहिला पर्याय निवडून करता येणार आहे.

एसबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बॅंकेच्या ७० लाखांहून अधिक ग्राहकांनी या अॅपवर नोंदणी केली आहे. ज्यातील १९ लाख लोक अॅप वर्जन वापरतात. इतर लोक एसएमएस आणि मिस्ड कॉलची सुविधा वापरतात.