‘शाओमी’ कंपनीने अलिकडेच आपल्या Redmi Note 10 सीरिजमध्ये तीन शानदार स्मार्टफोन लाँच केले. तिन्ही स्मार्टफोनपैकी Redmi Note 10 हा सर्वात स्वस्त फोन असून आजपासून हा फोन ओपन सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. आतापर्यंत हा फोन केवळ फ्लॅशसेलमध्.येच उपलब्ध होत होता, त्यामुळे खरेदी करण्यासाठी ग्राहकांना सेलच्या तारखेची वाट बघावी लागत होती. मात्र आता हा फोन ओपन सेलमध्ये उपलब्ध होणार असल्याने ग्राहक (mi.com) किंवा अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरुन कधीही खरेदी करु शकणार आहे. मात्र, ओपन सेलमध्ये केवळ 6जीबी रॅम व्हेरिअंटचीच खरेदी करता येईल. तर, 4जीबी मॉडेलसाठी मात्र अजूनही फ्लॅश-सेलची प्रतीक्षा करावी लागेल.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच शाओमीने आपल्या लेटेस्ट स्मार्टफोनसाठी नवीन Redmi Note 10 सीरिज भारतात लाँच केली. कंपनीने Redmi Note 10 सीरिजअंतर्गत तीन स्मार्टफोन लाँच केले. यात रेडमी नोट 10 (Redmi Note 10), रेडमी नोट 10 प्रो (Redmi Note 10 Pro) आणि रेडमी नोट 10 प्रो मॅक्स (Redmi Note 10 Pro Max) हे तीन स्मार्टफोन कंपनीने आणले आहेत. या फोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही फोनमध्ये सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, शिवाय कमी किंमतीत दमदार क्वॉड रिअर कॅमेरा सेटअपही मिळतो. यातील Redmi Note 10 हा स्मार्टफोन आता ओपन सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. जाणून घेऊया Redmi Note 10 चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत :

Redmi Note 10 स्पेसिफिकेशन्स :-
Redmi Note 10 मध्ये अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12 चा सपोर्ट असून फोनमध्ये 6.43 इंच फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनही मिळेल.  फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 678 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Adreno 612 GPU आहे. यात 6GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील प्रायमरी 48 मेगापिक्सेल सोनी IMX582 सेन्सर, दुसरा 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल, तिसरा 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आणि चौथा 2 मेगापिक्सेल डेफ्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, IR, USB टाइप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळतो. फोनमध्ये सेल्फ क्लिनिंग स्पीकर आहे. शिवाय Redmi Note 10 मध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली5000mAh ची बॅटरी मिळते. चार्जर फोनसोबत बॉक्समध्येच मिळेल.

Redmi Note 10ची किंमत :-
Redmi Note 10 ची बेसिक किंमत 11 हजार 999 रुपये आहे. ही किंमत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची आहे, तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. हा फोन अ‍ॅक्वा ग्रीन, फ्रोस्ट व्हाइट आणि शॅडो ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायात उपलब्ध असेल.