Samsung ने आपल्या गॅलेक्सी A सीरिजमधील एका नवीन स्मार्टफोनवरुन पडदा हटवलाय. Samsung Galaxy A32 4G या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये कंपनीने फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. याशिवाय एकूण पाच कॅमेरे आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए32 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा AMOLED इनफिनिटी-U नॉच डिस्प्ले असून डिव्हाइसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूला क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असून यात 64MP चा प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. तर, सेल्फीसाठी फोनच्या पुढीला बाजूला 20MP सेल्फी कॅमेरा मिळेल.

आणखी वाचा- 10 हजारांनी स्वस्त झाला Moto Edge+, मिळेल तब्बल 12 जीबी रॅमसह 108MP कॅमेरा

हा फोन 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी रॅम व 64जीबी/128जीबी इंटर्नल स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. कंपनीकडून प्रोसेसरबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन Awesome ब्लॅक, व्हाइट, ब्लू आणि व्हॉयलेट अशा चार रंगांच्या पर्यायात उपलब्ध असेल.

दरम्यान, सॅमसंगने या फोनची किंमत किती असेल किंवा कधीपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. पण Samsung Galaxy A32 4G या फोनच्या 5G व्हेरिअंटपेक्षा 4G व्हेरिअंटची किंमत कमी असण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये फोनच्या 5G व्हेरिअंटची किंमत भारतीय चलनानुसार जवळपास 33 हजार 400 रुपये आहे.