Motorola ने आपल्या एका शानदार फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने गेल्या वर्षी भारतीय बाजारात तब्बल 12 जीबी रॅम आणि 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला Moto Edge+ लाँच केला होता. आता हा फोन 10 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे.

Moto Edge+ फिचर्स:
Moto Edge+ हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुल एचडी प्लस डिस्प्लेसोबत येतो, डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनही आहे. ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रैगन 865 प्रोसेसरवर कार्यरत असलेला हा फोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये येतो. अँड्रॉइड 10 चा सपोर्ट असलेल्या या फोनला अँड्रॉइड 11 आणि अँड्रॉइड 12 अपडेट देखील मिळेल. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. तसेच फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी असून ही बॅटरी रिव्हर्स वायरलेस चार्जिंगलाही सपोर्ट करते.

आणखी वाचा- 5000mAh बॅटरी + 64MP कॅमेरा, Samsung चा नवीन स्मार्टफोन Galaxy A32 4G आला

Moto Edge+ कॅमेरा:
Moto Edge+ मध्ये कंपनीने ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिलाय. यातील मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसह येतो, तर दुसरा 16 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि तिसरा 8 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनच्या पुछील बाजूला 25 मेगापिक्सेल फ्रंट सेन्सरही आहे. फोनद्वारे 6K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते असा कंपनीचा दावा आहे.

Moto Edge+ किंमत:
गेल्या वर्षी मे महिन्यात लाँच करतेवेळी कंपनीने Moto Edge+ ची किंमत 74 हजार 999 रुपये ठेवली होती. आता १० हजार रुपयांची कपात झाल्याने नवीन किंमत 64 हजार 999 रुपये झाली आहे.