scorecardresearch

Premium

चहा किंवा काही खाल्ल्यानंतर छातीत किंवा घशाजवळ खूप जळजळ होतेय? करा ‘हे’ घरगुती उपाय मिळेल आराम

Acidity Home Remedies : बहुतेकांना काही खाल्ल्यानंतर छातीत किंवा घश्याजवळ जळजळ होऊ लागते. अशावेळी काय उपा करावे समजत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत, जे फॉलो करुन तुम्ही आराम मिळवू शकता.

3 home remedies to get rid of acidity permanently
छाती किंवा घशात खूप जळजळ होतेय? मग करा हे घरगुती उपाय मिळेल आराम (फोटो – freepik)

Home Remedies for Acidity & Gas Problem : अनेकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त तेलकट ाणि मसालेदार पदार्थ खाणे अशा लोकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. अशावेळी गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, उलट्या आणि अॅसिडिटीचा सर्वाधिक सामना करावा लागतो. यासाठी काही लोक स्वत:हून काही प्रकारची औषधे घेतात. मात्र यानंतरही आराम मिळत नाही, अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करुन छातीत होणाऱ्या जळजळीपासून आराम मिळवू शकता.

छातीत किंवा घशाजवळ जळजळ झाल्यास दिसतात ‘ही’ लक्षणे

पोटातील आम्ल वारंवार घशापर्यंत वाढते तेव्हा या समस्येला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग म्हणतात. त्यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, अन्ननलिकेत अॅसिड चढणे, छातीत दुखणे, घशात काहीतरी अडकल्याची भावना, घशात सूज येणे, खोकला ही लक्षणे दिसू शकतात.

Stomach Gas
पोटात गॅस वाढवतात ‘हे’ ४ पदार्थ; पण ‘हा’ उपाय केल्यास मिळू शकतो झटक्यात आराम
If You Skip Sugar Jaggery All Sweets What happens to your body on a no-sugar diet for a year like Kartik Aaryan ft Chandu Champion
वर्षभर साखर न खाल्ल्याने शरीराचं काय बदल होतात? कार्तिक आर्यनचा प्रयोग तुमच्या कामी येणार का?
liver failure sign
लिव्हर खराब झाल्यास पायात दिसतात ‘ही’ ५ लक्षणे; वेळीच धोका ओळखा
जाणून घ्या: अ‍ॅसिडिटी कशामुळे होते?; अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी काय करता येईल?

काही लोकांना खाल्ल्यानंतर लगेच जळजळ आणि ढेकर येत नाही, परंतु ही समस्या काहीवेळाने इतकी वाढते की, चहा किंवा पाणी प्यायल्यानंतरही अॅसिड होऊ लागते. तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही पोषणतज्ञ किरण कुकरेजा यांचे 3 घरगुती उपाय फॉलो करुन पाहा.

१) जेवणानंतर एक केळ खा

दुपारच्या जेवल्यानंतर तुम्ही केळी खाऊ शकता . त्यात पोटॅशियम असते, ज्यामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात जे अन्न अतिरिक्त ऍसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

२) सब्जाच्या बियांचे पाणी

१ चमचा सब्जाच्या बिया १ ग्लास पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवा. या बिया थंड असतात, त्यामुळे पोटालाही थंडावा मिळतो. त्यामुळे पोटाची आग आणि जळजळ कमी होते.

३) बडीशेपसह गुळ खा

जेवणानंतर १० ते १५ मिनिटांनी बडीशेप आणि गूळ खाणे आवश्यक आहे. बडीशेपमुळे अँटासिडी कमी करण्याचे काम करते आणि पचनशक्ती वाढवते. गॅस, पोट फुगणे, आंबट ढेकरही याने दूर होऊ शकतात.

( हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे औषध घेण्यापूर्वी किंवा उपचार करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Severe acidity symptoms nutritionist told 3 home remedies to get rid of s

First published on: 25-07-2023 at 17:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×