सफरचंद

सफरचंद पूर्णपणे पौष्टिक तत्त्वाने भरलेले आहे.

59-lp-appleआपण आज सफरचंदाविषयी जाणून घेऊ या. सफरचंद पूर्णपणे पौष्टिक तत्त्वाने भरलेले आहे. सफरचंद फक्त रोगांवर लढत करण्याची मदत करत नाही, तर शरीरही स्वस्थ ठेवण्यात मदत करते.

वैज्ञानिक अध्ययनाने असे कळले आहे कीसफरचंद सेवन करण्याने हृदयरोग, कर्करोग, मधुमेहाबरोबरच डोक्याचे आजार जसे पार्किंसन व अल्जाइमरमध्येही आराम मिळतो. सफरचंद रेशेचं फळ असल्यामुळे फायबरही खूप मात्रामध्ये आढळते. सफरचंद खाण्याने पाचनतंत्रसुद्धा चांगले होते. सफरचंद शरीरामधली ग्लुकोजची मात्राही सामान्य करते, त्यामुळे मधुमेह असलेल्यांना लाभ होतो.

एनेमियासारखा आजारही बरा होतो. सफरचंदामध्ये आयर्न खूप जास्त प्रमाणात असते. जर तुम्ही दिवसातून २ ते ३ सफरचंद खाल्ले तर हे पूर्ण दिवसाचे आयर्न मिळते.  सफरचंदामुळे वजन नियंत्रित करण्यास मदत होते.

सफरचंदमध्ये फाइबर जास्त प्रमाणात असल्यामुळे आपले दात स्वच्छ ठेवण्यात मदत होते आणि आपल्या तोंडातली थुंकी वाढविण्यासाठी मदत होते.

55-lp-foodइझी फ्राइड अ‍ॅपल विथ सीनेमोन

साहित्य :
१/४ कप बटर
६-७ सफरचंद कापून तुकडे करणे
१/२ कप ब्राऊन शुगर
१/४ टीस्पून दालचिनी पावडर
१/४ टीस्पून जायफळ पावडर.

कृती :
एका कढईमध्ये किंवा फ्राइंग पॅनमध्ये बटर वितळवणे, त्यात सफरचंदचे तुकडे टाकून चांगले परतून घेणे. त्यावर ब्राऊन शुगर, दालचिनी आणि जायफळ पावडर टाकून, लाल होईपर्यंत भाजणे. चांगले १० मिनिटे खरपूस होईपर्यंत परतणे.

टीप :
हे असे तळलेले सफरचंद साईड डिश म्हणून खाऊ शकता.. अतिशय चविष्ट लागतात.
सफरचंदाबरोबर दालचिनीच चांगली लागते. वेलची पावडर वापरू नये.

56-lp-foodसफरचंदचा हलवा

साहित्य :
२ कप किसलेले सफरचंद
२-३ मोठे चमचे साजूक तूप
१/४ कप मावा किंवा मिल्क पावडर (जे उपलब्ध असेल ते वापरणे)
१ कप दूध
४ ते ५ टीस्पून साखर (गोड जास्त हवे असेल त्याप्रमाणे साखर घेणे)
१/२ कप बारीक तुकडे केलेले अखरोट
१/४ टीस्पून दालचिनी पावडर.

कृती :
कढईमध्ये तूप टाकून सफरचंदचा किस परतून घेणे. त्यात मावा किंवा मिल्क पावडर टाकून चांगले परतणे, नंतर लगेच त्यात साखर व अखरोटचे तुकडे टाकून मोठय़ा गॅसवर ५-६ मिनिटे परतणे. थोडा हलव्याचा गोळा होत आला की त्यात दालचिनी पावडर टाकणे आणि गॅस बंद करून, हलवा थंड करत ठेवणे. त्यावर पिस्ता व बदाम काप लावून सजवणे.

टीप : सफरचंदाबरोबर अखरोट व दालचिनीच चांगली लागते.

58-lp-foodसफरचंद, द्राक्ष व सेलेरी सलाड

साहित्य :
१/४ कप कापलेले बदाम
२ सेलेरीच्या कडय़ा- बारीक चकत्या करून घेणे
१ सफरचंद कापून ४ भाग करणे व त्याचे पातळ चकत्या करणे
१ कप सीडलेस द्राक्ष घेणे आणि त्याचे दोन भाग करणे
१ टेस्पून वाइन विनेगर मिळाली तर उत्तम, नाहीतर साधे विनेगर
१ टेस्पून ऑलिव्ह तेल
मीठ आणि काळी मिरी पावडर.

कृती :
५ ते ६ मिनिटे बदाम मायक्रोवेव्हमध्ये भाजून घेणे. एका मोठय़ा बाऊलमध्ये सेलेरी, सफरचंद, द्राक्षे, विनेगर आणि ओलिव्ह तेल एकत्र करून घेणे आणि मीठ आणि मिरी पावडर घालून चांगले मिक्स करणे आणि वरून थोडी बाजूला ठेवलेल्या सेलेरीने सजवणे.

57-lp-foodसफरचंदची जिलबी/ फ्रीटर्स

साहित्य :
१/२ कप + २ टेस्पून साखर
३/४ टीस्पून दालचिनी पावडर
२ कप ताक
४ टीस्पून तेल व तळण्यासाठी तेल वेगळे घेणे
२ अंडी
२ कप मैदा
२ टीस्पून बेकिंग पावडर
१/२ टीस्पून मीठ.
४ कडक सफरचंद सोलून पातळ  चकत्या करणे.

कृती :
एका छोटय़ा बाऊलमध्ये अर्धा कप साखर + दालचिनी एकत्र करणे. दुसऱ्या बाऊलमध्ये ताक, तेल आणि अंडी चमच्याने नीट मिक्स करून घेणे. त्यात मैदा, २ टेस्पून साखर, बेकिंग पावडर आणि मीठ मिक्स करणे. एका कढईमध्ये तेल टाकून सफरचंद त्या ताक-मैद्यामध्ये घोळून तळून घेणे व गरम असताना त्यावर साखर-दालचिनी पावडर भुरभुरावी किंवा तळून साखरेच्या पाकातही टाकून खाऊ शकता.

टीप : सफरचंदबरोबर दालचिनीच चांगली लागते. वेलची पावडर वापरू नये.
सीमा नाईक – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Smart cooking apple fruit

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?