Viral Video: समाजमाध्यमांमुळे कोणतीही माहिती, फोटो, व्हिडीओ काही क्षणांत व्हायरल होतात. अनेक जण समाजमाध्यमांचा वापर समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठीही करतात; जी खूप चांगली बाब आहे. काही जण या संदर्भातील माहिती समाजमाध्यमांवर शेअर करतात; ज्यामुळे इतरांनादेखील त्याचा फायदा होतो. असाच एक व्हिडीओ एका व्यक्तीने शेअर केला आहे; जो काही क्षणांत चर्चेस आला आहे.

अनेकदा नावाजलेल्या हॉटेलमधील पदार्थांमध्ये किंवा बाजारातून विकत घेतलेल्या इतर पदार्थांमध्ये कधी कधी चुकीच्या गोष्टी आढळतात; तर कधी जो पदार्थ ऑर्डर केला जातो, त्याच्या जागी दुसराच पदार्थ आणून दिला जातो. मग त्यामुळे गैरसोय झाल्यावर अनेकदा ग्राहक वैतागून त्याचे व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर शेअर करीत असतात. आता असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे; ज्याबाबत त्याने समाजमाध्यमावर माहिती शेअर केली आहे.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi Was Attacked by Obscene Remark
“राजा नग्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने..”, नरेंद्र मोदींवर जगप्रसिद्ध वृत्तपत्राची गंभीर टीका? ऑनलाईन वादंग सुरु, खरे मुद्दे पाहा
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
loksabha election 2024 voting old man from pune got angary after not seeing bjps symbol on evm in pune
पुणेकर आजोबा काही ऐकेनात! मतदानाला गेले; पण कमळाचं चिन्हच दिसेना, मतदान केंद्रावरच संतापले VIDEO व्हायरल
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल

बेंगळुरूमधील एका व्यक्तीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला असून, त्याने ‘बार्बेक्यू नेशन’मधून शाकाहारी पदार्थ ऑर्डर केले होते. त्याच्या ऑर्डरमध्ये कोकसोबतच त्याने व्हेज पराठा आणि व्हेज बार्बेक्यूची ऑर्डर दिली होती; पण त्याला जी ऑर्डर मिळाली, त्यात नॉनव्हेज पदार्थ होते.

या व्यक्तीने त्याच्या x (ट्विटर) @Billod keshwar या अकाउंटवर व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने लिहिलेय, “मी @BarbequeNation वरून व्हेज थाळीची ऑर्डर केली; पण त्यांनी मला चिकन आणि अंडी दिली. हा प्रकार किती लाजिरवाणा आहे,” असे त्याने लिहिलेय. यावेळी त्याने @Swiggy आणि @SwiggyCares यांनादेखील टॅग केले आहे. त्याच्या गैरसोईची दखल घेत स्विगीने त्याला मदतीने आश्वासन दिले आहे. त्यांनी लिहिले, “आम्ही तुमच्या गैरसोईमुळे निराश आहोत. तुम्हाला निराश करण्याचा आमचा हेतू नव्हता. सेवा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही काटेकोरपणे लक्ष देऊ,”

हेही वाचा:आईचे प्रेम जगात भारी! वाघिणीच्या पिल्लांनी आईला कडकडून मारली मिठी… VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

पाहा व्हिडीओ:

‘बार्बेक्यू नेशन’नेदेखील त्यांच्या अकाउंटवरून या गैरसोईबद्दल त्यांनी त्या व्यक्तीची माफी मागितली आहे. “हो. ही एक खूप मोठी चूक आहे आणि त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही त्याची चौकशी करून, काय चूक झाली ते शोधून काढू. कृपया तुमचे नाव, मोबाईल नंबर, रेस्टॉरंट शाखा आणि तुम्ही ऑर्डर केलेली तारीख सोबत मेल करा.”