सध्या उन्हाचा तडाखा वाढतो आहे. मार्च महिन्यातच उष्णता प्रचंड वाढल्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन किंवा इतर हंगामी आजारांचा त्रास होऊ शकतो. आपण आपल्या रोजच्या आहारात काही असे पदार्थ खातो ज्याने आपल्या शरीरातील उष्णता ही आणखीन वाढते.

कलिंगड

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळ मानले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात या फळाचे सेवन नक्की करावे. कलिंगडात ९०% पेक्षा जास्त पाणी असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. कलिंगड हे शरीराला थंडावा देणारे अँटिऑक्सिडेंट आहे.

लिंबू

उन्हाळ्यात लिंबू पाण्यामुळे तुमचे शरीर थंड राहते आणि तुम्ही ताजेतवाने राहता. दिवसातून दोनदा हलकी साखरेसोबतही सेवन करू शकता. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. तसेच उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी पुदिना हा एक चांगला पदार्थ आहे. तुम्ही दही, ताक किंवा रायतामध्ये पुदिना मिक्स करू शकता. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

जांभूळ

जांभूळ हे फळ उन्हाळ्यात हमखास खायला मिळतं. चवीला आंबट-गोड व रसरशीत अशी लाबंट आकाराची जांभूळ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या फळात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे शरीराला पोषकत्व मिळते. लोहामुळे कावीळ, रक्तदोषाविकार हे आजार लवकर बरे होतात. जांभळाचे बी व साल यांचे चुर्ण मधुमेह या आजारावर अत्यंत उपयुक्त आहे. दात व हिरड्या कमकुवत झाल्या असतील व त्यातून रक्त येत असेल तर त्यावरही जांभळाच्या सालीचा वापर केला जातो. जांभळाच्या सरबतामुळे पोट साफ होण्यास मदत होते. पण जांभळे खाताना नेहमी काळजी घ्यावी, रिकाम्या पोटी जांभळे खाऊ नयेत.

करवंद

‘डोंगरची काळी मैना’ म्हणून ओळखले जाणारे करवंद या रानमेव्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. यात ‘क’जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आहे जे त्वचाविकारामध्ये अधिक फायदेशीर ठरते. शिवाय यात मोठ्या प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असल्याने या दिवसांत उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक आजारांवर करवंद फायदेशीर आहेत. या दिवसात उष्णतेमुळे शरीराची काहिली होते तेव्हा करवंदाचे सरबत प्यायल्याने अधिक आराम मिळतो. करवंदामध्ये फायबरदेखील भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असल्याने हाडांसाठी देखील करवंद उत्तम आहेत.

हेही वाचा >> Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप कसा करावा? असा करा स्वेट प्रूफ मेकअप

तुती

गावी गेल्यावर तुती हे फळ हमखास मिळतंच. तुम्हीही लहानपणी खूप तुती खाल्ले असतील. या फळात ‘अ’ जीवनसत्त्व तसेच कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते, ज्याचे उन्हाळ्यात सेवन करणे फायदेशीर ठरते. तुतीची फळं ही आंबट, गोड असतात