Summer Makeup Tips: प्रत्येक मुलीला मेकअप करायला आवडतो, काहीजण मेकअप केल्याशिवाय घराच्या बाहेरच पडत नाही. उन्हाळ्यात मेकअप करणे सोपे काम नाही. कारण उन्हाळ्यात घामामुळे हा मेकअप बरेचदा खराब होतो. हे टाळण्यासाठी, वॉटरप्रूफ मेकअप हा एक उत्तम पर्याय आहे, जो हवामानाच्या परिस्थितीचा सामना करताना बाहेरच्या वातावरणातही आपला मेकअप व्यवस्थित ठेवतो. अचानक मुसळधार पाऊस असो किंवा तुमचा पाण्याशी संपर्क आला तरी हा मेकअप खराब होत नाही. जसे की वर्कआउट करताना किंवा पोहणे किंवा घाम येणे.अशा परिस्थितीत, आपल्याला काही उन्हाळ्यातील मेकअप हॅकबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे, ज्याच्या मदतीने आपण उन्हात आणि घामातही आपला लूक ताजे ठेवू शकता. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात मेकअप कसा परफेक्ट ठेवता येईल.

सनस्क्रीन वापरा

loksatta analysis why when and how water supply cut impose in mumbai
विश्लेषण : मुंबईत का, कधी आणि कशी केली जाते पाणी कपात?
Health Special, Summer Rain,
Health Special: उन्हाळ्यातील पाऊस- किती चांगला, किती वाईट?
5 unique lassi recipes must try this summer
Lassi Recipe: उन्हाळा स्पेशल ५ दिवस प्या ५ प्रकारच्या लस्सी; कडक उन्हाळ्यात मिळेल थंडावा!
Badishep Sarbat Recipe Saunf Sharbat Fennel Seeds Juice For Summer Drinks
उन्हाळ्यात ५ मिनिटांत तयार होणारे बडीशेप सरबत प्या, उष्णता आणि पचनाच्या विकारावर प्रभावी गारेगार उपाय
Health Benefits of Lassi
तुम्ही उन्हाळ्यात रोज ताक किंवा लस्सी प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Pohe Kurdai Recipe in Marathi News Valvan Recipes In Marathi
ना गॅस पेटवायचा ना पीठ शिजवायचे; सोप्या पद्धतीने कमी वेळात बनवा “पोहा कुरडई”, ही घ्या सोपी रेसिपी
summer beauty hacks diy dark chocolate face mask for flawless skin
उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा डार्क चॉकलेट फेस पॅक, टॅन होईल गायब घरच्या घरीच करा तयार
heart health in danger in summer
Heart Attack In Summer : हृदयाचे आरोग्य जपा! उन्हाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

तुम्ही तुमच्या कॉम्पॅक्ट फाउंडेशनसह सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. यासाठी कोणताही जुना लिक्विड फाउंडेशन बॉक्स घ्या आणि त्यात फाऊंडेशनसोबत सनस्क्रीन मिक्स करा. आता ते कुशनच्या मदतीने त्वचेवर लावा. दर २ तासांनी लावत राहा.

प्रायमर आवश्यक

मॉइश्चरायझर लावल्यानंतर प्रायमर लावायला विसरू नका. यामुळे तुमचा मेकअप जास्त काळ त्वचेवर टिकून राहण्यास मदत होईल. हे छिद्र बंद करते आणि चेहऱ्यावर घाम येण्यापासून रोखते. प्राइमर तुमच्या मेकअपसाठी एक गुळगुळीत बेस तयार करतो, त्यामुळे मेकअप जास्त काळ टिकतो. पाण्याच्या संपर्कात असतानाही तुमचा मेकअप व्यवस्थित राहतो.

वॉटरप्रूफ प्रोडक्ट

मेकअप प्रोडक्ट खरेदी करताना वॉटरप्रूफ प्रोडक्टची निवड करा. वॉटरप्रूफ मस्करा, आयलाइनर आणि फाउंडेशन पाण्याच्या किंवा घामाच्या संपर्कात असतानाही चिकटत नाहीत किंवा पसरत नाहीत.

चेहऱ्यावर बेस मेकअप करताना काळजी घ्या

सर्वात जास्त काळजी चेहऱ्यावर बेस मेकअप करताना घेतली पाहिजे. उन्हाळ्यात मेकअप लाइट पातळ लेअरचा बेस असला पाहिजे. त्याने तुमचा मेकअप नॅचरल वाटतो. हेवी बेस ने मेकअप वेगळाच दिसायला लागतो. तसंच घाम आल्याने पोर्स बंद होतात. ज्याने तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सला जास्त त्रास होऊ शकतो.

हेही वाचा >> Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका

हे अजिबात करू नका

घाम आल्यावर चेहरा पुसण्यासाठी टिश्यू किंवा रुमाल वापर. टिश्यु किंवा रुमालाने अलगद घाम पुसा. चेहऱ्यावर अजिबात टिशु किंवा रुमाल घासू नका. त्याने तुमचा मेकअपच नाही तर तुमची स्किन पण खराब होऊ शकते.