टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाच्या (Vi) ग्राहकांना झटका बसलाय. कंपनीने गेल्या महिन्यातच आपल्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन्सच्या किंमतीत जवळपास 100 रुपयांची वाढ केली होती. पण ही वाढ काही ठरावीक सर्कलमध्येच झाली होती, मात्र आता कंपनीने ही दरवाढ देशभरातील सर्व सर्कलच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन्ससाठी लागू केली आहे. त्यामुळे आता व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना फॅमिली पोस्टपेड प्लॅन्ससाठी साधारण १०० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

दर वाढवल्याने आता ग्राहकांना व्होडाफोन-आयडियाच्या 598 रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनसाठी 649 रुपये मोजावे लागतील. तर, 699 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 799 रुपये झाली आहे. तर, 999 आणि 1,348 रुपयांच्या फॅमिली प्लॅनच्या किंमतीत बदल झालेला नाही.

649 रुपयांचा प्लॅन :-

649 रुपयांच्या फॅमिली प्लॅनमध्ये दोन कनेक्शन मिळतात. यातील मुख्य कनेक्शनवर 50 जीबी आणि दुसऱ्या कनेक्शनवर 30 जीबी डेटा मिळतो, म्हणजे या प्लॅनमध्ये एकूण 80 जीबी डेटा मिळतो. याशिवाय मुख्य कनेक्शनवर 200 जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरचा पर्याय आहे, तर दुसऱ्या कनेक्शनवर 50 जीबीपर्यंत डेटा रोल ओव्हरचा पर्याय मिळतो. याशिवाय दोन्ही प्लॅन्सवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 SMS पाठवण्याची सेवाही मिळते. यासोबतच वर्षभरासाठी डिझ्नी + हॉटस्टार VIP, अ‍ॅमेझॉन प्राइम, झी5 आणि Vi movies अँड TV चं मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल.

799 रुपयांचा प्लॅन :-

आता Vi च्या 799 रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये तीन कनेक्शन मिळतात. मुख्य कनेक्शनवर 120 जीबी डेटा आणि अन्य दोन कनेक्शनवर 30-30 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये डेटा रोलओव्हरची सुविधा 649 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहे. या प्लॅनमध्येही सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 SMS मोफत पाठवता येतात. यासोबतच वर्षभरासाठी डिझ्नी + हॉटस्टार VIP, अ‍ॅमेझॉन प्राइम, झी5 आणि Vi movies अँड TV चं मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल.

999 आणि 1348 रुपयांचा प्लॅन :-

या व्यतिरिक्त 999 रुपये आणि 1348 रुपयांच्या प्लॅन्सच्या किंमतीत कंपनीने बदल केलेला नाही. ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये पाच कनेक्शन मिळतात बाकी अन्य सेवा वरील प्लॅन्सप्रमाणेच आहेत. तर 1348 रुपयांच्या प्लॅनमध्ये अन्य ओटीटी अ‍ॅप्ससोबतच नेटफ्लिक्सच्या बेसिक प्लॅनचा अ‍ॅक्सेस वर्षभऱासाठी मोफत मिळतो.