How To Disinfect Soil In Plants Video: आपल्या घरातील बाग फुलांनी बहरून जावी, सकाळी उठल्यावर आपल्याला छान हिरवळ दिसावी अशी इच्छा अनेकांची असते. त्यासाठी मेहनत घेऊन अनेकजण छान रोपं, साजेश्या कुंड्या, सजावटीला शोभेच्या लाईट्स घेऊन येतात. पण रोपांची निगा राखणे हे सुंदर बागेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर सुरुवातीला तरी छान सुंदर रोपांनी बाग बहरून जाईल पण नंतर लगेचच पाने सुकायला आणि कुंड्या ओसाड व्हायला सुरुवात होऊ शकते. रोपांची निगा राखणे म्हणजे काय तर तण उपटून टाकणे, वेळोवेळी खत, पाणी व सूर्यप्रकाश पुरवणे, तसेच कीटकांमुळे किंवा बुरशीमुळे मातीला संसर्ग होऊ नये याचीही काळजी घेणे. तुळस किंवा भाज्यांच्या रोपांच्या कुंडीतील मातीमध्ये केमिकलयुक्त खतांचा वापर करणे हे घातक ठरू शकते त्याऐवजी आपल्याला वापरता येईल असं नैसर्गिक खत आपण आज पाहणार आहोत.

@mission_Green_India या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या घरगुती बागकामाच्या टीपनुसार मातीला संसर्गमुक्त ठेवण्यासाठी आपण हळदीचा वापर करू शकता. आपल्याला माहितीच आहे की हळदीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. आपल्याला संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवण्यासाठी जशी हळद उपयुक्त ठरते, तशीच ती मातीतलं बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठीही याचा फायदा होऊ शकतो. पण हळद थेट मातीत टाकल्यास त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. त्याऐवजी आपल्याला अर्धा लिटर पाण्याचा फंडा वापरायचा आहे.

Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
Lucky bamboo plant care
बांबूचे रोप सुकत चाललयं? ‘या’ सोप्या पद्धतीने घ्या काळजी
blossoms of Cosmos flowers in Autumn season
निसर्गलिपी – शरद ऋतूतील बहर…
Air in Borivali , Byculla Air , Navinagar , Shivajinagar,
बोरिवली आणि भायखळ्यातील हवा सुधारली, निर्बंध उठवण्याची शक्यता, नेव्हीनगर आणि शिवाजीनगरवर लक्ष
Villagers in Old Dombivali oppose scientific waste disposal project
जुनी डोंबिवलीतील ग्रामस्थांचा शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट प्रकल्पाला विरोध
iit bombay researchers discover bacteria that prevent growth of pollutants in agricultural soil
शेत जमिनीतील वाढते प्रदूषक रोखणाऱ्या जीवाणूंचा शोध; आयआयटी मुंबईतील संशोधकांमुळे जमीन होणार सुपीक

अर्धा लिटर कोमट पाण्यात एक टेबलस्पून हळद मिसळून हे पाणी आपल्याला मातीत ओतायचे आहे. पाहा व्हिडीओ

हे ही वाचा<< तुळशीचं रोप पाणी देऊनही सुकतंय? मातीत रोप लावताना ३० टक्के ‘ही’ गोष्ट मिसळा, लहान कुंडीतही येईल बहर

दरम्यान, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा उपाय महिन्यातून निदान एकदा करायचा आहे. तसेच हे हळदीचे पाणी आपण संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास मातीमध्ये मिसळणे फायद्याचे ठरू शकते ज्यामुळे रात्रभर हे पाणी चांगले शोषले जाते

Story img Loader