How To Clean Water Tanki Without Removing Water: घरच्या नळाला पाणी येतं म्हणून ते शुद्धच असेल असा विश्वास ठेवणं म्हणजे आजारांना आमंत्रण देण्यासारखंच आहे. नळाला पाणी चांगलं येतं, टाकी पण आपल्याच घरातील आहे पण त्या टाकीत जिथून पाणी येतं ते ठिकाण कसं आहे आपण कुठे बघायला जातो? अनेकदा गढूळ पाणी टाकीत स्थिरावल्यावर वरती असणारं पाणी ही दिसायला स्वच्छ असतं पण त्यातही मातीचे- धुळीचे- चिखलाचे कण मिसळतातच ना? वारंवार गढूळ पाणी येत असल्यास टाकीत गाळाचाच वेगळा थर तयार होतो. आता हा गाळ स्वच्छ करायचा तर सगळी टाकी ओतून टाका, टाकीत आत उतरा आणि स्क्रबने घासा, अशी प्रचंड मेहनत करावी लागते. पण आज आपण असा जुगाड पाहणार आहोत ज्यामुळे टाकीत न उतरता किंवा पाणी न ओतून टाकता सुद्धा आपण गाळ काढून टाकू शकतो. अवघ्या पाच मिनिटांत टाकी स्वच्छ करण्याचा हा उपाय कसा काम करतो, पाहूया..

प्राजक्ता साळवे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्लास्टिकची जुनी बॉटल वापरून केलेला जुगाड दाखवला आहे. आपल्याला तोंडाच्या बाजूने साधारण दोन बोटांइतकं (उभं) अंतर ठेवून बाटली कापायची आहे. मग उरलेल्या बाटलीचा सुद्धा तुम्ही पेन स्टॅन्ड किंवा लहानसं रोप लावण्यासाठी उपयोग करू शकता. त्यानंतर बाटलीच्या कापून घेतलेल्या भागाला खालून बारीक चिरा करायच्या आहेत. बाटली पातळ असल्यास तुम्ही कात्री वापरूनही या चिरा करू शकता (शक्यतो बाटली थोडी पातळच असुद्या) मग तुम्हाला एका साध्या तोटीमध्ये (पाईप) पीव्हीसीचा थोडा बारीक पाईप घालून त्याला एका बाजूने आपल्या बाटलीचं तोंड लावायचं आहे. चिकटपट्टीने नीट बॉटल चिकटवून घ्या. दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही पीव्हीसी पाईपचा तुकडा लावू शकता. एकदा जरी तुम्ही हे टूल बनवले तरी अनेक महिने वापरता येईल.

How to clean Cooler at home
Jugaad Video: कुलर सुरु करण्याआधी ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; मिनिटांत होईल तुमचा कुलर स्वच्छ, कुबट वास येणार नाही!
Ceiling fan cleaning tips
Jugaad Video: पंखा सुरु करण्याआधी ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; टेबल-खुर्ची न वापरता मिनिटांत होईल तुमचा पंखा स्वच्छ
How To Make Home Made And Super Tasty Egg Cutlets Note The Recipe
१५ मिनिटांत बनवा टेस्टी अन् पौष्टिक ‘अंड्याचे कटलेट’ ; पाहा सोपी रेसिपी…
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

मग आता अखेरीस टाकी स्वच्छ करण्याआधी, बाटलीच्या तोंडाकडील भागातून पाणी भरायचे आहे. अगदी दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजेच पूर्ण पाईप हा पाण्याने भरलेला हवा. यामुळे बाटलीचं तोंड जेव्हा तुम्ही टाकीत टाकाल तेव्हा त्याच प्रेशर ने गाळ निघायला सुरुवात होईल आणि तोंडाने पाणी खेचण्याची गरज उरणार नाही. बॉटलचं तोंड टाकीत घाला आणि मग संपूर्ण टाकीत फिरवा. व्हॅक्युमप्रमाणे काम करणारं हे टूल काहीच वेळात गाळ असलेले पाणी बाहेर काढेल.

हे ही वाचा<< मोबाईल चार्ज करताना झालेल्या चुकीने ४ भावंडांचा अंत! चार्जर खरेदी ते चार्जिंगची जागा, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच

हे कामी करताना जे पाणी बाहेर पडणार आहे ते गढूळ असलं तरी आपण झाड-रोपांना देऊ शकता. पाणी वाया न घालवता टाकी स्वच्छ करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली सांगा.