लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर लवकरच एक नवीन फिचर येणार आहे. WhatsApp कडून अनेक दिवसांपासून व्हॉइस मेसेजच्या प्लेबॅक स्पीड फिचरवर चाचणी सुरू आहे. जाणून घेऊया कसं काम करणार हे फिचर :

Voice Messages Playback Speed Feature या नवीन फिचरद्वारे युजरला कोणताही व्हॉइस मेसेज वेगाने किंवा हळू स्पीडने ऐकता येईल. या फीचरअंतर्गत युजर्स कोणत्याही व्हॉइस मेसेजसाठी तीन विविध स्पीड निवडू शकतो. यासाठी ऑडिओ प्लेबॅक स्पीड लेवल 1x, 1.5x आणि 2x असे तीन पर्याय मिळतील.

याशिवाय, कोणताही व्हॉइस मेसेज पाठवण्याआधी तो रिव्ह्यू करता येणार आहे. म्हणजेच व्हॉइस मेसेज सेंड करण्याआधी आता तो युजरला ऐकताही येणार आहे. आतापर्यंत व्हॉइस मेसेज रेकॉर्ड होताच आपोआप सेंड व्हायचा, पण आता सेंड करण्याआधी युजरला आपला मेसेज ऐकता येणार आहे. मात्र सध्या या फिचरवर टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यावर लवकरच कंपनीकडून अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी हे फिचर रोलआउट केलं जाईल.