हिवाळा अचानक आला. वेगात वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे अंगावर काटा येतो आहे. अशा वातावरणात लोकरीच्या कपड्यांशिवाय थंडीमध्ये आपली अवस्था खराब होईल. आपल्यासा सहसा हिवळ्यातच उबदार कपड्यांची गरज भासते. पण बराच काळ न वापरल्यामुळे कपाटात ठेवलेल्या उबदार कपड्यांना एक विचित्र वास येतो ज्यामुळे ते वापरणे कठीण होत आहे. हिवाळ्यात ऐनवेळी हे कपडे धुणे आणि वाळवणे थोडा वेळखाऊ असू शकते.

दुर्गंधीमुळे तुम्हीही हिवाळ्यातील कपडे घालण्यास संकोच करत असाल तर काळजी करू नका. काही खास टिप्स वापरून तुम्ही न धुताही तुमच्या लोकरीच्या कपड्यांमधील दुर्गंध दूर करू शकता. चला जाणून घेऊयास्वेटर कानटोपी मफलर उबदार कपड्यांच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी कोणत्या उपाय वापर करू शकता.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
diy best safe summer travel tips and tricks health tips for summer vacation
उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंबासह फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग जाताना ‘या’ चार गोष्टी आठवणीने बरोबर घ्या

व्हाईट व्हिनेगर शिंपडा
लोकरीच्या कपड्यांचा वास दूर करण्यासाठी कपड्यांवर व्हाईट व्हिनेगर स्प्रे करा. कपड्यांवर फवारणी करण्यासाठी, एक स्प्रे बाटली घ्या आणि त्यात अर्धा व्हाईट व्हिनेगर आणि अर्धे पाणी भरा. दोन्ही गोष्टी नीट एकत्र करून घ्या. लोकरीचे कपडे घालण्यापूर्वी हे सिरप कपड्यांवर शिंपडा. हे कपडे घालण्यापूर्वी सुमारे एक किंवा दोन दिवस सुकण्यासाठी लटकवा जेणेकरून व्हिनेगरचा वास निघून जाईल.

हेही वाचा – आलिंगन किंवा मिठी मारणे हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

आवश्यक तेल शिंपडा
कपड्यांचा वास दूर करण्यासाठी स्प्रे बाटलीत पाणी भरा आणि त्यात आवश्यक तेलाचे (Essential Oil) काही थेंब घाला. हे मिश्रण चांगले मिसळा आणि नंतर कपड्यांवर स्प्रे करा. स्प्रे केल्यानंतर, ते काही काळ कोरडे होऊ द्या आणि नंतर ते वापरू शकता . अत्यावश्यक तेलाची शिंपडल्याने कपड्यांमधली दुर्गंधी दूर होईल आणि कपड्यांना चांगला वास येईल.

लिंबू पाणी फवारणी
जर तुम्हाला लोकरीच्या कपड्यांचा वास टाळायचा असेल तर पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. लिंबू पाण्यात मिसळून शिंपडल्याने दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कपड्यांना चांगला वास येऊ लागतो. पाण्याच्या स्प्रे बाटलीमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि स्वेटरच्या काखेत आणि कंबरेसारख्या भागावर स्प्रे करा कारण या ठिकाणी सर्वाधिक दुर्गंधी येते. तुमचे कपडे हवेत सुकू द्या आणि मग ते वापरू शकता.

हेही वाचा – भाज्या-फळांचा ओला कचरा वापरून नैसर्गिकरित्या घरीच तयार करा खत; पहा व्हायरल व्हिडीओ

फॅब्रिक स्प्रे वापरा
लोकरीच्या कपड्यांमधून दुर्गंध दूर करण्यासाठी, फॅब्रिक स्प्रे वापरा. हे स्प्रे वापरणे सोपे आहे. तुम्ही कपड्यानंवर हे स्प्रे वापरा आणि त्यांना हवेत कोरडे करू शकता. काही वेळ हवेत वाळवल्याने कपड्यांचा खराब वास दूर होईल आणि सुगंध येईल.