रक्तक्षयालाच पंडुरोग, रक्तपांढरी, रक्ताल्पता, रक्त सुकणे अशा नावांनी ओळखले जाते. हल्ली तरुणांमध्येही याचे प्रमाण वाढताना दिसते. एका सर्वेक्षणानुसार १६ ते २५ या वयोगटांतील ५६ टक्के मुली तर ३० ते ३५ टक्के मुले रक्तक्षयाने पीडित आढळून आल्या आहेत. चाळिशीच्या उंबरठय़ावर असणाऱ्या अनेक स्त्रिया थकवा येत असल्याने डॉक्टरांकडे जातात. त्यातील ८० टक्के स्त्रियांना रक्तक्षय झाल्याचे आढळून येते. अगदी कामकरी वर्गापासून उच्चविभूषित स्त्रियांमध्येही रक्तक्षय आढळून येतो.

रक्तक्षय म्हणजे काय?

Pushpalata, Decoration
निसर्गलिपी: पुष्पलता
control blood sugar
रक्तातील साखर कमी करून मधुमेहावर नियंत्रण ठेवायचयं? फक्त ‘या’ दोन गोष्टी करा; महिनाभरात दिसेल फरक
13th May Panchang Monday Shubh Muhurta Mesh To Meen Rashi
१३ मे पंचांग: सिंह, तूळ, वृश्चिकसह ‘या’ राशींचा आठवडा होईल जोशात सुरु; कुणाच्या राशीत चमकतील सूर्य- चंद्र, वाचा भविष्य
Symptoms of Ovarian Cancer
Ovarian cancer: गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे ८० टक्के महिलांना समजतच नाही; ‘या’ सुरुवातीच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
Why buy gold on Akshaya Tritiya
लक्ष्मीचे होणार आगमन! अक्षय्य तृतीयेला सोने का खरेदी करावे? सोन्याशिवाय ‘या’ गोष्टीही खरेदी करणे मानले जाते शुभ
Lakshmi Narayan Rajyog, Akshaya Tritiya
‘अक्षय्य तृतीयेला’ लक्ष्मी नारायण योग बनल्याने ‘या’ ३ राशींना चिरकाल धनप्राप्तीची संधी; १९ मे पर्यंत आनंदी आनंद गडे
Women Health, Thyroid, Weight Gain,
स्त्री आरोग्य : थायरॉइडच्या समस्येमुळे वजन वाढतं का?
Health Special What exactly is heatstroke How to avoid it What is the solution
Health Special: उष्माघात म्हणजे नेमके काय? तो कसा टाळायचा? उपाय काय?

रक्तात आढळून येणाऱ्या लाल पेशींचे प्रमाण पुरेसे नसते किंवा या पेशी आरोग्यसंपन्न नसतात. रक्तकणांचे (हिमोग्लोबिन) प्रमाणही कमी असते. हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिन यांचा बंध निर्माण होऊन हिमोग्लोबिन तयार होते. प्राणवायू पेशीपर्यंत वाहून नेण्याचे काम त्याद्वारे साधले जाते. हिमोग्लोबिन कमी झाले की पेशींना प्राणवायूचा पुरवठा कमी प्रमाणात केला जातो आणि थकवा येणे हे लक्षण प्रामुख्याने निर्माण होते. रक्तक्षयात लाल रक्तपेशींचा आकारही बघितला जातो. लहान आकाराला मायक्रोसायटिक तर आकार मोठा झाला असल्यास मेगालोब्लास्टिक म्हणतात.

लाल रक्तपेशींची अपुरी/ सदोष निर्मिती

लाल रक्तपेशींच्या योग्य निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांमध्ये दोष किंवा कमतरता असेल तर रक्तक्षय होतो. हे घटक खालीलप्रमाणे आहेत-

लोह

हाडांमधील मऊसर भाग- अस्थिमज्जेला लाल रक्तकणांची निर्मिती करताना पुरेसे लोहतत्त्व आवश्यक असते. मात्र पोषणात्मक आहाराची कमतरता (भाज्या-फळे-प्रथिने यांचा अल्प समावेश, जंकफूडचे सततचे सेवन), स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी अधिक लोहयुक्त आहार न घेणे, पचनसंस्थेचे काही आजार (उदा : क्रोन्स डिसीज), जठराचा काही भाग किंवा लहान आतडे शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकणे, विशिष्ट औषधांचा दुष्परिणाम, कॅफिनयुक्त पेयांचा अतिरेकी वापर यांमुळे मायक्रोसायटिक अ‍ॅनिमिया होतो.

लोहाची अतिमात्रा

रक्तक्षय आहे म्हणून अधिक दिवस/ अधिक मात्रेत मनाने औषधे घेऊ  नयेत. लोहाची मात्रा जरुरीपेक्षा जास्त झाली तर उलटय़ा, जुलाब, डोकेदुखी, अस्वस्थता, सांध्याचे विकार, थकवा इत्यादी लक्षणांना सामोरे जावे लागते.

बी-१२ जीवनसत्त्व व फॉलिक अ‍ॅसिड

यांची कमतरता मेगालोब्लास्टिक अ‍ॅनिमिया निर्माण करते.  जीवनसत्त्वांचे पुरेसे शोषण न होणे किंवा आहारातील कमतरता रक्तक्षयाला कारणीभूत ठरते. भाज्या व मांसाहाराचे सेवन कमी असणे, तसेच भाज्या खूप काळ शिजवणे यामुळेही जीवनसत्त्वे पुरेशी मिळू शकत नाहीत. मद्यपान, विशिष्ट औषधे, गर्भारपण, आतडय़ांचे विकार यातही जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते आणि रक्तक्षयास कारणीभूत ठरते.

शिसे या धातूचा विषाक्त परिणाम

शिसे हे बोनमॅरोला अतिशय घातक असते. त्यामुळे लाल रक्तपेशींच्या निर्मितीस धक्का बसतो. पेन्सिलची टोके, तसेच रंगाचे कपचे खाण्याची मुलांना सवय असते. विशिष्ट कामाच्या ठिकाणी शिशाचा सतत संपर्क येऊ  शकतो. भांडय़ांना जर व्यवस्थित गेल्झिंग केले नसेल तर अशा भांडय़ातून शिसे पोटात जाऊ  शकते.

स्टेमसेल्स

या मूळ पेशींपासून पुढे लाल रक्तपेशी व लाल रक्तकण तयार होण्याची प्रक्रिया घडून येते. या स्टेमसेल्स पुरेशा प्रमाणात नसल्याने रक्तक्षय होतो. हा जनुकदोष असून याला अप्लास्टिक अ‍ॅनिमिया असे म्हणतात. काही वेळा बोनमॅरोवर आघात होऊन- (जंतुसंसर्ग, रेडिएशन, विशिष्ट औषधे, केमोथेरेपी इत्यादी) अशा तऱ्हेचा रक्तक्षय होतो.

थॅलसिमिया

यामध्ये लाल रक्तपेशींची वाढ खुंटलेली असते. यात ‘मेजर’ व ‘मायनर’ असे दोन प्रकार आढळतात. मायनर असणाऱ्या व्यक्ती आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतात. दोन मायनरनी लग्न करून जन्माला येणारे बाळ हे मेजर असते आणि त्याला आयुष्यात सतत झगडावे लागते.

इतर काही आजार 

मूत्रपिंडाचे विकार, हायपोथायरॉइडिझम, सतत होणार जंतुसंसर्ग, मधुमेह, संधिवात, कर्करोग अशा आजारांमध्येही लाल रक्तपेशी आजारी पडतात/ निर्मिती प्रक्रियेस बाधा निर्माण होतो आणि रक्तक्षयाची लक्षणे जाणवू लागतात. म्हातारपणामुळेही अनेकदा अशी समस्या निर्माण होते.

लाल रक्तपेशींचा नाश

जेव्हा लालरक्तपेशी अतिशय नाजूक होतात आणि रक्तभिसरणाचा प्रवाह/ दाब त्यांना सहन होत नाही तेव्हा त्या लवकर नाश पावतात, तुटतात/ फाटतात. या पेशींचे ठरावीक दिवसांचे जीवनचक्र असते. निर्मितीपेक्षा नाश पावणाऱ्या पेशी अधिक झाल्याने हिमोलिटिक अ‍ॅनिमिया होतो.

सिकल सेल अ‍ॅनिमिया, थॅलसिमिया, मूत्रपिंड विकार, वाढलेला रक्तदाब, रक्त गोठण्यासंदर्भात असणारे विकार, हृदयाच्या झडपांचे विकार, तीव्र अपघात, जंतुसंसर्ग, सापाचे वा कोळ्याचे विष या गोष्टींमुळे लाल रक्तपेशी अवेळी नाश पावतात आणि रक्तक्षयाची लक्षणे निर्माण होतात. पोटात दुखणे, हातापायांना वेदना होणे ही प्रमुख लक्षणे आढळून येतात.

गर्भारपण

गर्भारपणात रक्तामधील द्रवाचे प्रमाण वाढलेले असते. काही महिन्यांत हे प्रमाण अधिक होते आणि यामुळे रक्तकण जरा सौम्य होतात. हे नैसर्गिक असते, पण म्हणूनच अशा स्त्रियांना अधिकच्या लोहाचे सेवन करण्यास सांगितले जाते.

चाचण्या

सी.बी.सी. (पेशींचा आकार, प्रमाण इ. समजते), फेरेटिन लेव्हल (शरीरातील लोहाचे साठे किती प्रमाणात आहेत हे समजते), बी-१२ व फॉलिक आम्लाचे प्रमाण आणि इतर विशिष्ट चाचण्या रुग्णाच्या इतिहासानुसार डॉक्टर ठरवतात.

उपाय

प्राथमिक स्वरूपाच्या रक्तक्षयात आहार व औषधे लागू पडतात. प्रामुख्याने लोहयुक्त पदार्थ, बी-१२ व फॉलिक आम्ल असणारे पदार्थ आणि जोडीला उत्तम प्रथिने तसेच क-जीवनसत्त्व उपयोगी पडते. लोहयुक्त गोळ्या या आम्लधर्मी वातावरणात अधिक चांगले काम करतात.

आहार

  • लोह- हिरव्या पालेभाज्या, खजूर, सर्व प्रकारच्या डाळी, सोयाबीन, ओट्स, गूळ, काळ्या मनुका, जर्दाळू, तीळ, चणे, उडीद, लाल भोपळा, मध, बीट, मटार, टमाटा, डार्क चॉकोलेट, शेंगवर्गीय भाज्या, सारडीन व टय़ूना मासे.
  • फॉलिक अ‍ॅसिड (बी-९)- सोयाबीन, पालक, मटार, भेंडी, मका, गाजर, पालेभाज्या, केळी, डाळिंब, कलिंगड, खजूर, पेरू, पपई, संत्रे, शेंगदाणे, बदाम, जवस, कडधान्ये, अंडी.
  • बी-१२- गाईचे दूध, दही, चीज, पनीर, अंडी, टोफू, कोरफड, काही प्राण्यांचे मांस.
  • क-जीवनसत्त्व – आवळा, टमाटा, द्राक्षे, संत्रे, चेरी, पपई, पालक, पेरू, मका, बटाटा, रताळे, काकडी, कोबी, भेंडी, कांदा, लिंबू, डाळिंब.
  • प्रथिने- सर्व प्रकारच्या डाळी, सोयाबिन, शेंगदाणे, काजू, बदाम, हिरव्या पालेभाज्या, शेंगवर्गीय भाज्या, गहू, तांदूळ, कडधान्ये, लोणी, दूध, दही, तीळ अंडी, चिकन, मका.

औषधे-

  • गोळ्या व पातळ औषधांच्या स्वरूपात घेतलेली औषधे कमतरता भरून काढतात. काही वेळा लोहतत्त्वाची व जीवनसत्त्वाची इंजेक्शने दिली जातात.
  • रक्त देणे- यात लाल रक्तपेशींचा साठा शरीरास आवश्यकतेनुसार पुरवला जातो.
  • कर्क रोग असल्यास रेडिएशन, केमोथेरेपी अशी चिकित्सा केली जाते.

काही वेळा एरिथ्रोपोएटिन या संप्रेरकाची इंजेक्शने दिली जातात. ते लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. पेशींना प्राणवायू कमी पडला तर मूत्रपिंडाद्वारे याची निर्मिती होऊन लाल रक्तपेशींची निर्मिती वाढवली जाते.

बोनमॅरो ट्रान्सप्लांट- यात स्टेमसेल्स दिल्या जातात. हिमॅटोलॉजिस्टच्या तज्ज्ञ सल्ल्याने हा निर्णय घेतला जातो.     – डॉ. संजीवनी राजवाडे

लक्षणे- 

थकवा येणे, कमजोरी वाटणे, स्मृती कमी होणे, व्यायामानंतर डोके दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चालताना आणि जिना चढताना दम लागणे, छातीत धडधडणे- जीव घाबरणे, झोप नीट न लागणे, त्वचा-डोळे-नखे निस्तेज वाटणे, हातापायांच्या मांसपेशींमध्ये ताठरता निर्माण होणे, काही वेळा काविळीची लक्षणे निर्माण होणे, नाडीचे व हृदयाचे ठोके वाढणे, हातापायांना मुंग्या येणे/ सुया टोचल्याप्रमाणे जाणीव होणे, पायांमध्ये विचित्र संवेदना होणे, एकाग्रता कमी होणे, विचारांची चालना बाधित होणे इत्यादी. फार काळ रक्तक्षय असेल तर वागणुकीवर आणि मेंदूवर परिणाम होऊन कार्यक्षमता कमी होते. कधी कधी पेपर, माती, बर्फ, गवत, केस आदी खाण्यास वाटणे अशा विचित्र सवयी दिसून येतात.

कारणे

  • शरीरातून रक्त वाहणे/ वाया जाणे
  • पोटातील व्रण, मूळव्याध, लघवीतून रक्त जाणे, संडासवाटे रक्त जाणे, पोटातील सूज, कर्करोग अशा कारणांनी सतत रक्त वाया जाण्याने रक्तक्षय निर्माण होऊ शकतो.
  • स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी अधिक रक्तस्राव होत असेल किंवा दर १५-२० दिवसांच्या अंतराने पाळी येत असेल तर अधिक रक्त बाहेर जाऊन रक्तक्षय होऊ शकतो.
  • विशिष्ट प्रकारची वेदनाशामक औषधे किंवा स्टिरॉइड्समुळे पोटात सूज येते आणि व्रण निर्माण होऊन त्याद्वारे हळूहळू रक्त वाहून रक्तक्षय होतो.
  • एखाद्या अपघातामुळे, शस्त्रक्रियेदरम्यान रक्त अधिक वाहण्यानेही रक्तक्षय होतो.
  • आतडय़ात होणारा जंताचा संसर्गसुद्धा रक्त वाया जाण्यास कारणीभूत ठरतो.

dr.sanjeevani@gmail.com