News Flash

रक्ताचे नाते!

माणसांमध्ये शरीराच्या वजनाच्या प्रमाणात आठ टक्क्यांएवढे रक्त असते.

डॉ. आशीष भोसले

रक्तदान मोहिमेच्या निमित्ताने रक्ताचे गट सर्वसामान्यांना माहीत झाले आहेत. या रक्तगटासोबतच रक्तातील प्लाझ्मा, तांबडय़ा पेशी, पांढऱ्या पेशी  हे विविध घटक वेगळे करून साठवले जातात. संपूर्ण रक्ताऐवजी आवश्यकतेनुसार हे घटक रुग्णांना दिले जातात. रक्तातील हे घटक व त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार यांची ही प्राथमिक स्वरूपाची माहिती.

माणसांमध्ये शरीराच्या वजनाच्या प्रमाणात आठ टक्क्यांएवढे रक्त असते. हे प्रमाण लक्षात घेता सामान्य वजनाच्या प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर रक्त असते. रक्तांमधील विशिष्ट घटकांप्रमाणे ‘अ’, ‘ब’, ‘अब’ आणि ‘ओ’ हे रक्तगट असतात. या प्रत्येक गटाचे मिळून आठ रक्तगट होतात. याशिवाय ‘आर-एच’ नावाचा एक घटकही अनेक व्यक्तींमध्ये आढळतो. अशा व्यक्तींच्या रक्तगटाला + (पॉझिटिव्ह) म्हणतात. ज्या व्यक्तींच्या रक्तात हा घटक नसतो त्याला – (निगेटिव्ह) म्हणतात. मराठीत धन (+) व ऋण

(-)  असे शब्द वापरले जातात. बॉम्बे हा सर्वात दुर्मीळ रक्तगट आहे. ‘ओ’ रक्तगट असलेल्या ज्या व्यक्तींमध्ये एच अँटेजीन नसतो, त्या व्यक्तीचा रक्तगट बॉम्बे रक्तगट म्हणून ओळखला जातो. रक्तात तांबडय़ा पेशी, पांढऱ्या पेशी, प्लाझ्मा, प्लेटलेट्स हे घटक असतात. तांबडय़ा पेशींमध्ये असलेल्या प्रथिनांमुळे रक्तगट ठरतो. या प्रथिनांना प्रतििपडे म्हणतात.

रक्तातील घटक आणि प्रमाण

प्लाझ्मा

रक्तात प्लाझ्माचे प्रमाण ५५ टक्के असते. प्लाझ्मामध्ये सुमारे ९२ टक्के पाणी असते. उर्वरित आठ टक्क्यांमध्ये अल्बुमिन, ग्लोबिलीन, फायब्रिनोजीन ही महत्त्वाची प्रथिने, सोडिअम, पोटॅशिअम, क्लोराइड ही खनिजे, ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साइड हे वायू, प्रतिद्रव्ये, जीवनसत्त्वे, अमिनो अ‍ॅसिड, हार्मोन, एन्झाइम्स हे घटक असतात.

कार्य – शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे. शरीरातील वाहते रक्त गोठवण्याचे कार्य.

आजार – रक्तक्षय, संसर्ग, संधिवात या आजारात प्लाझ्मा कमी होतो.

तांबडय़ा रक्तपेशी

यात रक्तातील हिमोग्लोबिन असते. लाल रक्तपेशीत ग्लायकोप्रथिने असतात. या विशिष्ट प्रथिनामुळे रक्तगट ठरवता येतो.

तांबडय़ा पेशींचे कार्य – तांबडय़ा पेशी ऑक्सिजन वहनाचे काम करतात. हे कार्य मुख्यत्वे पेशींमधील हिमोग्लोबिनच्या माध्यमातून होते. हिमोग्लाबिन ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते. हृदयापासून शरीरातील विविध अवयवांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम तांबडय़ा पेशींकडे असते.

आजार – हृदयाचे आजार, रक्तदाब, स्थुलता या आजारात तांबडय़ा पेशी कमी होतात. रक्तवाहिन्यांच्या दोषामुळे हृदयाचे आजार अधिक बळावतात.

पांढऱ्या रक्तपेशी

या रक्तपेशी शरीरातील प्रतिकार यंत्रणेचा भाग आहेत. एक घन मायक्रोलिटरमध्ये ४ ते ११ हजार पांढऱ्या पेशी असतात.

पांढऱ्या पेशींचे कार्य – या पेशी परजीवी जिवाणूंना आणि संसर्गाना प्रतिकार करतात. पांढऱ्या रक्तपेशी या रक्तातील संरक्षक पेशी असतात. रक्तप्रवाहातील अकार्यक्षम पेशी बाहेर काढून टाकण्याचे काम पांढऱ्या पेशी करतात.

आजार – पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. कुपोषण, रक्त

दूषित होणे या आजारात पांढऱ्या पेशी कमी होतात. हाडांचे दुखणे, यकृताचे आजार तसेच कर्करोगावरील केमोथेरपीच्या उपचारांमध्ये पांढऱ्या पेशी कमी होतात.

 प्लेटलेट्स किंवा िबबिका

तांबडय़ा पेशी आणि बहुतांश पांढऱ्या पेशींप्रमाणेच हाडांच्या आवरणातून प्लेटलेट्स तयार होतात. मोठय़ा हाडांमधील मेगा कॅरासाइट्समधून तीन ते चार दिवसांत नव्याने प्लेटलेट्स तयार होतात. निरोगी माणसाच्या शरीरात प्लेटलेट्सचे प्रमाण दीड ते साडेचार लाख  प्रति मायक्रोलिटर असते.

प्लेटलेट्सचे कार्य – यातील फायब्रिन या घटकामुळे रक्तामध्ये झालेल्या तंतूमय गाठीत लाल रक्तपेशी अडकतात. यामुळे रक्त शरीराबाहेर येणे थांबते. जंतुसंसर्ग टळतो. यात रक्त गोठवणारे घटक असल्यामुळे शरीराला जखम झाल्यास रक्तस्राव नियंत्रित करतात.

आजार – डेंग्यू या आजारात रुग्णाला ताप येतो आणि तापामुळे रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. या तापात रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. शरीरांतर्गत किंवा बाह्य़ रक्तस्राव होतो. यामुळे रक्तातील प्लेटलेट्स घसरतात. आनुवंशिक आजार, केमोथेरेपीतही प्लेटलेट्स कमी होतात.

रक्ताची साठवणूक

रक्तदान झाल्यानंतर रक्तपेढीमध्ये २.६ अंश सेल्सिअस तापमानाला रक्त साठवून ठेवले जाते. हे रक्त सुमारे २५ दिवसांपर्यंत साठवता येते. काही वेळा रक्तदान झाल्यावर त्यातील घटक वेगळे काढले जातात. मात्र आता अत्याधुनिक यंत्राद्वारे दात्याच्या रक्तातून आवश्यकतेनुसार घटक घेऊन उर्वरित रक्त पुन्हा त्याला देता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 12:43 am

Web Title: blood relation
Next Stories
1 मना पाहता! : रागाचा निचरा
2 पंचकर्म : रजोनिवृत्तीच्या काळातील पंचकर्म
3 पिंपळपान : आघाडा
Just Now!
X