Sister bonding Viral video: मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप. काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक, कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल भरलेलं आभाळ रितं कराया, तिचीच ओंजळ पुढे येई,जागा जननीची भरून काढाया देवाने निर्मिली आईनंतर ताई. भावंडाचं नातं हे सर्वात वेगळं आणि अनोखं असतं. मग ते बहीणभावाचं असो अथवा बहिणीबहिणींचं. प्रत्येकालाच आपली लाडकी बहीण प्रिय असते. तिच्याशी जितकं भांडता येतं तितकाच तिच्यावर प्रेमाने हक्कही गाजवता येतो. कधी कधी ती रुसल्यावर तिची समजूत काढण्यात एक वेगळीच मौज असते. आईबाबांना तुमचं नाव सांगायला ती जितकी तत्पर असते तितकीच त्यांचा मार आणि ओरडा मिळू नये म्हणून तुमची काळजीही घेते. वडीलांप्रमाणे आधार देते आणि आईप्रमाणे जीवापाड प्रेमही करते.

अशाच दोन बहिणींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्यापासून दूर असणाऱ्या बहिणीची आठवण येईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोघी बहिणी बऱ्याच वर्षांनी एकमेकींना भेटणार असतात. याचं निमित्त ठरतं ते एका बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस. या लग्नाच्या वाढदिवसादिवशी कुटुंबातील सगळे पुन्हा एकदा तीच लग्न लावणार आहेत. यावेळी आपल्या बहिणीलाही त्यांनी बोलावलं आहे. अशा दोन बहिणींची बऱ्याच वर्षांनी भेट होते आणि दोघीही आनंदून जातात.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
American women ties knot with maharashtrian man american bride video
अमेरिकेची लेक भारताची सून; अमेरिकन नवरी नवऱ्याला चोरून पाहतानाचा VIDEO तुफान व्हायरल
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Father daughter emotional Video
जेव्हा लेक पहिल्यांदा माहेरी येते; शेतकरी बापाचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

सर्व कुटुंबियांनी मिळून हे सरप्राईज दोघी बहिणींसाठी प्लॅन केलेलं असतं. या दोघीही एकमेकींना बघून गळाभेट करत आहेत. लहानपणापासून एकत्र राहणाऱ्या भावंडांना नंतर लग्नानंतर वेगवेगळ्या दिशेनं जावं लागतं. मात्र हेच भाऊ-बहिण जेव्हा भेटतात तेव्हा पुन्हा जुने दिवस जगतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?

हा व्हिडीओ digereshma नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “बहीणीचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं, निखळ असं नातं आयुष्यभर जपण्याचं, इथे असतो फक्त जिव्हाळा अन असतो अतूट विश्वास, बंधन नसतं कुठलं त्यात निर्मळ हास्याचं असतं खास, सोन्याहून सुंदर असं जगात आहे अनमोल, नातं असं हे आपुलकीचं भाऊ बहिणीच्या प्रेमाचं” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओवर नेटकरी प्रतिक्रिया देत भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.