* सुंठ, बडिशेप व खसखस समभाग पावडर करून तुपावर भाजून या सर्वाच्या एकत्र मिश्रणाएवढी साखर घालून अर्धा ते एक सपाट चमचा, दोन्ही जेवणाअगोदर कोमट पाण्याबरोबर घ्यावे. पोटात मुरडून, कळ येऊन, थोडे थोडे पांढरे बुळबुटीत शौचास होणे, थोडय़ाशा निमित्ताने वारंवार पोट बिघडणे, बऱ्याचदा शौचाला गेल्यावर संडासाऐवजी नुसती पांढरी आंव पडणे या सर्वावर या मिश्रणाचा खूप उपयोग होतो.

* वारंवार थोडा थोडा ताप येत असेल तर त्याला तांब्याभर पाण्यात एक चमचा सुंठ घालून ते चांगले उकळवून तेच पाणी पिण्यास द्यावे. गर्भवतीलाही ताप आल्यास कोमट दुधातून सुंठ द्यावी.

* सुंठीवाचून खोकला गेला असे म्हणतात! एक वाटी खडीसाखरेच्या पाकात एक चमचा भर सुंठ पावडर घालून एक कढ काढून थंड झाल्यावर तो ‘सुंठ पाक’ थोडा थोडा वारंवार चाखावा, वारंवार येणारा खोकला किंवा खोकल्याची ढास लगेच थांबते. सुंठ, ज्येष्ठमध व सीतोपला चूर्णही मधातून चाटवल्यास बऱ्याच दिवसांचे खोकले बरे होतात.

chart

– वैद्य राजीव कानिटकर