‘हल्ली बरीच पुस्तकं निघाली आहेत. अमुक गोष्ट आयुष्यात कशी कराल? यश कसं मिळवाल? स्वत:ला उद्युक्त कसं कराल वगैरे वगैरे. असल्या पुस्तकांचा उपयोग होतो का हो डॉक्टर?’ मनाप्रमाणे अभ्यास करण्यासाठी पुरेसा उत्साह वाटत नाही, अशी तक्रार घेऊन उपचारासाठी आलेल्या सुदीपच्या प्रश्नाला हो किंवा नाही असं एकेरी उत्तर देणं अशक्य होतं.

‘तू कुठल्या तरी विशिष्ट संदर्भात हा प्रश्न विचारतो आहेस असं वाटतं. असं एखादं पुस्तक तू वाचलंस का?’

How does the brain respond when you are afraid science behind our adverse fear reactions to we all must know
“बापरे! मला तर भीती वाटतेय…” मेंदूचा प्रतिसाद; पण छातीत धडधड; जाणून घ्या भीतीमागील गणित
article about income tax reforms in india
लेख : राजकीय-वित्तीय लोकशाहीच्या मिलाफासाठी..
bhakri stomach health marathi news, chapati stomach health marathi news
Health Special: भाकरी, पोळी की चपाती – पोटासाठी काय चांगले?
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!

‘तुम्ही बरोबर ओळखलंत. मी गेले अनेक दिवस एक इंग्रजी पुस्तक वाचतोय. पॉझिटिव्ह थिंकिंगवर. त्यात लेखकाने सकारात्मक विचार कसा करावा यावर बरंच काही दिलंय. सकारात्मक स्वप्नं बघा, नकारात्मक विचारांना थारा देऊ नका, नकारात्मक विचार आले तर ते झटकून टाका, नकारात्मक विचारांबरोबर तुम्ही तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जेला निमंत्रण देता आणि तुमच्या हातून कुठलंच चांगलं काम होत नाही. माझं नेमकं हेच होतंय. गेली तीन वर्ष मी माझ्या आयुष्याशी झगडतोय. मी सीएच्या परीक्षेत सतत नापास होतोय. माझा आत्मविश्वासच गेलाय. मला काही जमणार नाही असंच मला वाटतंय. एकदा वाटतं की, सरळ सोडून द्यावं आणि नोकरीला लागावं. पण पुन्हा वाटतं की, इथपर्यंत आलोय तर एक शेवटचा प्रयत्न करून बघावा. आणि  माझा प्रयत्न यशस्वी होतच नाही.’

‘तू खूप निराश दिसतोस. तुझं वजनही खूप जास्त आहे असं वाटतं. तेही गेल्या काही दिवसांतच वाढलंय का?’

‘गेल्या दोन वर्षांत माझं वजन वीस किलोंनी वाढलंय. ते कमी करण्यासाठीदेखील माझ्याने अजिबात प्रयत्न होत नाहीत. मला हल्ली आरशात स्वत:कडे बघवतही नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मला उदास, निराश वाटतंय. म्हणून तर या पुस्तकाच्या मागे लागलो. म्हटलं बघू या त्यामुळे काही फरक पडतो का ते. पुस्तकात ठिकठिकाणी सकारात्मक विचारांबद्दल लिहिलंय. पण माझ्या मनात येतच नाहीत सकारात्मक विचार.’

‘तुझी झोप कशी आहे?’

‘सारखा आळस असतो. झोप आल्यासारखं होतं. रात्री पूर्ण झोप घेऊनही दिवसा झोप असते डोळ्यांवर. आमच्या फॅमिली डॉक्टरांनी थायरॉइडसकट सगळ्या तपासण्या करून घेतल्या. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत.’

सुदीपला चक्क नैराश्य (डिप्रेशन) नावाचा आजार आहे. तो गेले अनेक महिने त्या आजाराशी झगडतो आहे. त्याच्या परीने तो खूप प्रयत्न करतो आहे. त्याला मिळालेलं ‘स्व-मदत’ पुस्तक त्याला सकारात्मक विचार करायला शिकवतं आहे. पण त्याच्या मनात येणारे निराशाजनक विचार तो मुद्दामहून करत नसून ते नैराश्य या आजाराचा भाग आहेत. नकारात्मक विचारांचा फळा पुसून टाकून सकारात्मक विचार त्यावर लिहिता आले असते तर किती छान झालं असतं! मेंदूत घडणाऱ्या रासायनिक असंतुलनामुळे हे विचार निर्माण झाले आहेत. त्यावर उपायाची सुरुवात औषधांनीच व्हायला हवी. जसजशी त्याची मन:स्थिती सुधारत जाईल तसतशी त्याच्या ऊर्जेच्या पातळीत वाढ होईल. तरीही एकदम सकारात्मक विचार येणं कठीण आहे. थोडंसं बरं वाटल्यानंतर त्यातल्या त्यात सोपं तो काय सुरू करू शकतो? शारीरिक व्यायाम! व्यायामाबद्दल एकदम सकारात्मक विचार वगैरे येणं कठीणच आहे. पण रोज थोडा थोडा व्यायाम प्रत्यक्षात करणं जास्त सोपं आहे. व्यायाम प्रत्यक्षात करणं ही सकारात्मक कृती झाली. सकारात्मक कृतीचे सकारात्मक परिणाम हे लगेच जाणवतात. नुसताच ‘आपण व्यायाम करायला हवा’ हा पोकळ सकारात्मक विचार करून जर व्यायामाची कृती घडत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. सकारात्मक विचारांचा पाठपुरावा करणारी पुस्तकं सकारात्मक कृतींचा पाठपुरावा करताना फारशी दिसत नाहीत. आत नकारात्मक असली तरी थोडय़ाशा ऊर्जेनिशी सकारात्मक कृती सुरू केली तर त्या कृतीमुळे आतली नकारात्मकताच हळूहळू गायब होते!

सुदीपने सध्या त्या पुस्तकाप्रमाणे सकारात्मक विचार करण्याचा नाद सोडून द्यावा. म्हणजे आपण तसा विचार करू शकत नाही ही खंत आपोआपच दूर होईल. त्याने सकारात्मक कृतीची कास धरावी. त्यातूनच यश मिळेल. रामदासस्वामी जे म्हणून गेलेत – ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’, ते कृतीबद्दलच बोलताहेत, विचाराबद्दल नाही!

डॉ. मनोज भाटवडेकर drmanoj2610@gmail.com