साधारण शतकापूर्वी रुडयार्ड किपिलग या लेखकाने त्याच्या ‘किम’ या कादंबरीमध्ये ‘जगाच्या आतील एक वेगळे जग’ व ‘जिथे स्वत: देव नांदतो’ असं म्हणत ज्या ठिकाणाची तारीफ केली होती ते ठिकाण म्हणजे स्पिती व्हॅली! आणि आश्चर्य म्हणजे १०० वर्षांनंतरही येथील काहीच बदललेलं नाही! उलट हे ठिकाण त्याच्या अफलातून सौंदर्यामुळे आता अधिकाधिक पर्यटकांना आकर्षून घेत आहे.

लाहुल-स्पिती हा हिमाचल प्रदेशचा उत्तर- ईशान्य असा पसरलेला भाग. या परिसरात हिमालयाची सुंदर आणि रौद्र रूपे एकाच वेळी अनुभवयास मिळतात. हिमाचल प्रदेश राज्यातील उत्तर पूर्वीय भागात कोल्ड डेझर्ट माऊंटन व्हॅली पसरलेली आहे तीच ही स्पिती व्हॅली. ‘लाहौल स्पिती’ म्हणजे हिमाचल प्रदेशमधील दुर्गम भागातील एक पर्यटनस्थळ. स्पितीचा अर्थ ‘मध्यवर्ती भूभाग’ असा होतो. भारत आणि तिबेट सीमेवर वसलेला हा भाग त्याच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याने प्रत्येकाला भुरळ घालतो. ज्यांना भटकंतीची मुळातच आवड आहे अशा भटक्यांना/ बायकर्सना/ फोटोग्राफर्सना आणि अ‍ॅडव्हेंचरची मनापासून आवड असणाऱ्यांसाठी हा भाग म्हणजे पर्यटनाची मक्का-मदिनाच! स्पितीमधील भटकंती म्हणजे कॅमेऱ्याच्या मेमरी कार्डातही न मावणारा आनंद ठरतो! येथील निसर्ग अगदी रांगडा म्हणावा असा. निसर्गाशी साधम्र्य साधत बांधलेल्या वेगवेगळ्या स्तुपांमधून, गोम्पांमधून साचेबद्ध, आखीव-रेखीव सौंदर्यखुणा आपल्याला ठायी ठायी दिसतात. स्पिती व्हॅलीमध्ये येण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मनाली-रोहतांग पास-कुंझुमपास माग्रे काझा तर दुसरं शिमला, रिकाँग पिओ, कल्पा नाकोमाग्रे टाबो, काझा. स्पितीचा पूर्व-ईशान्येकडील भाग हा तिबेटच्या आंतरराष्ट्रीय सीमेला जोडलेला आहे. त्यामुळे या भागावर तिबेटी संस्कृतीची छाप जास्त प्रमाणात दिसून येते. दक्षिणेकडील स्पितीचा भाग हा शिमलापासून अंदाजे ४०० किलोमीटरवर आहे. तर मनाली माग्रे स्पितीचं मुख्यालय ‘काझा’ हे ४५० किलोमीटरवर आहे. एनएच-२२ माग्रे स्पितीला जाणारा रस्ता म्हणजे जगातील सगळ्यात धोकादायक रस्त्यांपकी एक मानला जातो.

mayawati west up statehood
उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन
Buldhana, Police Seize 4 Pistols, Live Cartridges, Buldhana Madhya Pradesh Border, Buldhana Madhya Pradesh Border Operation, police operation, pistols seize in buldhana, buldhana crime news, crime news, buldhana news, lok sabha 2024,
बुलढाणा : चार पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात कारवाई
25 seats in North East are challenging for BJP
ईशान्येकडील २५ जागा भाजपसाठी आव्हानात्मक
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार

स्पितीमधील डोंगरांच्या कुशीत वसलेली नितळ तळी हे इथलं वेड लावणारं आश्चर्य. आकाश आणि पाण्याचा एक झालेला रंग आपल्याला मोहवून टाकतो. त्यातूनही येथील चंद्रताल लेक जरा उजवाच. याच्या काठावर तंबू ठोकून रात्री गप्पा मारत चांदण्याच्या आकाशात हरवून जाण्यासारखं सुख नाही! संपूर्ण आकाशगंगा आपल्यासमोर अवतरल्याचा अनुभव घ्यायचा असेल तर पीन व्हॅलीला नक्की भेट द्यावी! कोणत्याही दूरदर्शी दुर्बणिीशिवाय दिसणारा तो तेज:पुंज तारकांचा समूह आपल्याला जणू एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. जून ते ऑक्टोबर या उन्हाळ्याच्या काळात येथील कमाल तापमान २२ आणि किमान ४ डिग्रीपर्यंत असते. हा येथे भेट देण्याचा उत्तम हंगाम. नोव्हेंबर ते मे या हिवाळ्याच्या काळात हिमवर्षांवामुळे स्पितीचा मार्ग बंद होतो. येथील दऱ्याखोऱ्या विलक्षण गूढ भासतात.

किन्नौर हिमाचल प्रदेशमधील पूर्वेकडील एक नितांत सुंदर जिल्हा. किन्नौर जिल्ह्याचे मुख्यालय रिकाँग पिओ येथे आहे. ‘सतलज’, ‘बस्पा’, ‘स्पिती’ नदीच्या काठावर वसलेले रिकाँग पिओ, कल्पा, सांगला, छितकुल हे येथील पर्यटनस्थळे. खरं तर संपूर्ण किन्नौर जिल्हाच पर्यटनासाठी उत्तम आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी किन्नौरला भेट दिलीच पाहिजे. किन्नौर व्हॅलीचा नजारा अगदी मंत्रमुग्ध करणारा आहे. थेट गगनला भिडणारी हिमशिखरे नजरेचं पारणं फेडतात तर दरीतून वर येणारे ढगांचे पुंजके हिमशिखरांना बिलगतात तेव्हा त्यांचा अगदी हेवा वाटतो.

येथील आरस्पानी तळी, मॉनेस्ट्री यासारखेच स्पिती व्हॅलीमधील आणखी एक आश्चर्य म्हणजे जगातील सर्वात उंचावरील पोस्ट ऑफिस. स्पिती व्हॅलीमधील हिक्कीम या गावाला ‘हायेस्ट पोस्ट ऑफिस इन द वर्ल्ड’चा बहुमान मिळाला आहे. मोठय़ा प्रमाणावरील बर्फवृष्टीमुळे वर्षांतून सहा महिने बंद असणारे हे पोस्ट ऑफिस तब्बल १४,४०० फुटांवर आहे.

हा परिसर निवांत पाहायचा झाला तर कमीत कमी ८-१० दिवस पाहिजेत. लाहौल आणि स्पिती व्हॅलीचा प्रवास तुम्हाला एका अनोख्या जगात घेऊन जातो. या शांत-निरव वातावरणात स्वतशी साधलेला संवाद आपल्याला एक वेगळीच अनुभूती देतो. दूरवर पसरलेला मंतरलेला दिसणारा शुभ्र बर्फ आणि त्याच ठिकाणी आजबाजूला दिसणाऱ्या हिरव्यागार दऱ्या असं अनोखं कॉम्बिनेशन डोळे दिपवतं. सोबतीला असते ती मातकट तर कधी चॉकलेटी रंगाची माती व त्यामध्ये डोकावणारे शुभ्र पांढरे गोम्पा. अतिशय मानसिक शांतता देणारी आणि त्याचबरोबर अ‍ॅडव्हेंचरने भरलेली स्पिती व्हॅलीची टूर म्हणजे अनोखा अनुभव ठरते.

 

उत्तरेतील हिमालयीन भटकंती म्हणजे लडाख अशी सध्या आपल्याकडे व्याख्या झाली आहे. पण हिमालयाचं एक अनोखं सौंदर्य स्पिती खोऱ्यात दडलेलं आहे. त्याची ओळख पर्यटकांना तशी कमीच आहे. ती करून घ्यायला हवी. स्पितीचे सौंदर्य आपल्याला वेगळ्याच विश्वात नेते.

स्मृती आंबेरकर writersmruti@gmail.com