08 July 2020

News Flash

हेअरस्टाइल कशी ठेवू?

मला वेगवेगळ्या हेअरस्टाइल्स करायला आवडतात. पण, कित्येकदा काही हेअरस्टाइल्स माझ्या चेहऱ्याला सूट होत नाहीत. आपल्या चेहऱ्याच्या आकारावर केसांचं पार्टिशन अवलंबून असतं का?

| July 24, 2015 01:07 am

मला वेगवेगळ्या हेअरस्टाइल्स करायला आवडतात. पण, कित्येकदा काही हेअरस्टाइल्स माझ्या चेहऱ्याला सूट होत नाहीत. आपल्या चेहऱ्याच्या आकारावर केसांचं पार्टिशन अवलंबून असतं का? माझा चेहरा गोल आणि केस मध्यम उंचीचे आहेत. मला कोणते पार्टिशन सूट होईल?
– सुरभी देशमुख, २०

सुरभी, छोटीशी हेअरस्टाइलसुद्धा कित्येकदा आपल्या लुकमध्ये खूप फरक आणते. त्यामुळे तुला हेअरस्टाइल ट्राय करायला आवडतं हे मस्तच आहे. अर्थात तुझी शंकाही बरोबर आहे. आपल्या चेहऱ्याच्या आकारावर आपल्याला कोणते पार्टिशन सूट करेल हे खूपदा अवलंबून असत. त्यामुळे हेअरस्टाइल करताना चेहऱ्याचा आकार लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या चेहऱ्याचा आकार गोल आहे आणि केस मध्यम उंचीचे आहेत. ते लक्षात घेता केसांचं साइड पार्टिशन करणं योग्य ठरेल. तुझ्या केसांना फ्रिन्जेस असतील तर उत्तमच. त्यामुळे तुझ्या चेहऱ्याचा आकार उठून दिसेल. याशिवाय एका बाजूला डीप पार्टिशन करून दुसऱ्या बाजूने केस मोकळे ठेवू शकतेस. डीप पार्टिशन केल्यास रंगीत क्लिप्स वापरता येतात. तुला हाफ टाय हेअरस्टाइलसुद्धा चांगली दिसेल. केसांना थोडे कलर्स केलेस तर उत्तमच.

माझी स्किन ऑयली आहे. त्यामुळे लगेचच चेहऱ्यावर चिकट थर जमा होतो. माझ्या चेहऱ्याला कोणतं मॉइश्चराझर सूट होईल?
– प्रणाली कदम, २१.

मॉइश्चराइझर आपल्या स्किनची गरज असते. पण, त्याचंबरोबर योग्य मॉइश्चराइझर निवडणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे मोठे ब्रॅण्ड किंवा आपल्या मैत्रिणी कोणतं मॉइश्चराइझर वापरताहेत ते पाहण्यापेक्षा आपल्या स्किनला कोणतं मॉइश्चराइझर सूट होतंय हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे. ऑईल आणि वॉटरबेस असे दोन मुख्य प्रकार मॉइश्चराइझरमध्ये मिळतात. तू सांगितल्याप्रमाणे तुझी स्किन ऑयली आहे, त्यामुळे तुला वॉटरबेस मॉइश्चराइझर सूट होईल. ते लाइटवेट असतं आणि चेहऱ्यावर लगेच शोषलं जातं. त्यामुळे चेहऱ्यावर चिकटपणा दिसत नाही. अर्थात तुझ्या दिनचर्येवरसुद्धा तुझी मॉइश्चराइझरची निवड अवलंबून असते. तुझे बाहेर फिरणे अधिक असेल तर मॉइश्चराइझरमध्ये योग्य प्रमाणात सनस्क्रीम असेल याची काळजी घे. कारण उन्हात फिरल्याने काळवंडणाऱ्या त्वचेवर मॉइश्चराइझर पुरेसे नसते. मॉइश्चराइझरमध्ये सनस्क्रीम याची काळजी घे. अर्थात मॉइश्चराइझर कधी लावावं यावरही त्याचे गुण अवलंबून असतात. आंघोळीनंतर लगेच मॉइश्चराइझर लावणे सर्वात उत्तम असतं. नाही तर मॉइश्चराइझर लावण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुऊन मग त्यावर मॉइश्चराइझर लावावे.

आवाहन : शनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2015 1:07 am

Web Title: fashion 15
टॅग Fashion,Style
Next Stories
1 पावसाळ्यात लेदर बॅग्ज नकोतच
2 फ्रेशर पार्टीत कूल दिसायचंय?
3 टॅटू डिझाइन निवडताना…
Just Now!
X