कुठच्याही बागेत किंवा बंगल्यावर पाटी असते की, फुले तोडू नयेत. लहानपणी मला फुले खूप आवडायची. आम्ही विकत घेऊन घालायचो. हौसेला मोल नसते. असो. नमनाला धडाभर तेल पुरे! फुले सर्वाना आनंद देतात. फुललेली फुले बघून तर वेडच लागते आणि त्यांच्या सुगंधाची दखल तर मानसिक समाधान देते. अर्थात काही फुलांना वास नसतो. पण ती झाडावर छान दिसतात. त्यांना तोडल्यावर थोडय़ा वेळात बावतात; म्हणून पाटी लावत असावेत की, फुले तोडू नयेत; ते आता मोठे झाल्यावर कळते.

स्त्रियांना फुले केसात माळायला आवडतात. म्हणजे फुले तोडल्यावरच गजरा बनणार ना? फुले देवाला वाहायला लागतात, घरात फुले ठेवल्यावर वातावरण प्रसन्न होते. त्यामुळे झाडावर फुले ठेवून कसे चालेल? आता तर फुलांचा व्यापार करतात. आपले गुलाब परदेशातपण जातात; त्याकरिता व्यापारी मोठमोठय़ा बागा तयार करतात. लग्नात व इतर समारंभातपण फुलांचा सर्रास व्यापार करतात. म्हणजे फुलांना झाडावरून खाली उतरवणे आलेच! गुलाबापासून शिकण्यासारखे आहे – काटय़ात राहून फुलायचे. काटे असले; तरी गुलाब तोडतोच. ‘व्हॅलेंटाईन डे’ला तर ऊतच येतो. प्रेमिकच नव्हे तर सर्व जण एकमेकांना फुले देऊन आपले प्रेम दाखवत असतात.

summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं

मानवावर कितीही संकटे आली; तरी हसत- हसत लढावे. हार मानू नये. दुसऱ्यांना आनंद द्यावा. इ. गुण फुलांपासून शिकता येतात. कमळ नाही का चिखलात राहून स्वच्छ राहते? आपले ‘राष्ट्रीय – फूल’ आहे. आम्हाला कमळाचा अभिमान आहे. निसर्ग आपल्याला शिकवत असतो. शिकणे मानवाचे काम आहे. व्यवहारात आपण ‘जशास तसे’ करतो; परंतु फुलांना तोडले; तरी ती आपल्याला आनंदच देतात. जो क्षमा करतो; तो खरा ज्ञानी पुरुष! दुसऱ्याचे हिसकावून खाणाऱ्याचे पोट कधी भरत नाही (उदा. राजकारणी) आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही. (एक तीळ सात जणांनी वाटून घेतला होता ना?)

दूरदर्शन किंवा सिनेमामुळे आपण परदेशी फुलांची हौस फिटवून घेऊ शकतो. ‘सिलसिला’ सिनेमात टय़ुलिप्स (tulips)ची फुले बघून नेत्रसुख अनुभवले. वास – गंध आला नाही; तरी समाधानाची खाण मिळाली. रात्री रातराणी फुलून सुगंध पसरवते; तर सकाळी पारिजातकाचा सडा बघून मन उल्हसित होते. काही फुले अल्पकाळ असतात; पण आहेत तोपर्यंत ‘चैतन्य’ जागवतात. तसेच माणसाने आहे त्या आुयष्यात चांगली कर्मे करावीत, फळाची अपेक्षा न करता! पुष्कळ दिवस सर्वाच्या तुम्ही लक्षात राहता.

‘मनी-प्लाान्ट’ बंगल्यात किंवा घरात असतात. हिरवीगार पाने बघून मन सुखावते. लांबच्या लांब वेल दिसली की सकारात्मक स्पंदने येतात. मानव किंवा फुले यांना एकमेकांचे देणे-घेणे नसते; पण आनंद घडवून आणतात. काही घरांत ‘मनी-प्लान्ट’ फुलदाणीत लावून मध्ये मध्ये फुले घालून आकर्षक पुष्परचना करतात. बघणाऱ्याला आणि करणाऱ्याला आनंद मिळतो.

जैन धर्माप्रमाणे जीव असलेल्या कोणालाही दुखवू नये. साधारण सर्व धर्मात दुसऱ्याला दु:खातून बाहेर काढावे, हाच नियम आहे. आता नवीन पद्धत म्हणजे फुलांना कुस्करून किंवा फुलांच्या पाकळ्या तोडून रांगोळ्या घालतात. नवविवाहित जोडप्यांचा बिछाना फुलांच्या पाकळ्यांनी सजवतात. वातावरणर धुंद-फुंद होते. फुलांना विस्कटले; तरी फुले आनंदच पसरवतात. तसेच माणसाने दु:स्वास न करता दुसऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवावा.

तडजोड करण्यात कमीपणा वाटता कामा नये. मोडतोड करायला ज्ञान लागत नाही; पण तडजोड करायला शहाणपण लागते. ‘फुलासंगे मातीस वास लागे’- फूल मातीत पडल्यावर आपण त्याकडे बघत नाही; पण फूल चूपचाप आपले काम करीत असते- मातीला सुगंधित करते. आपण केलेल्या कामाचा गवगवा करू नये. जीवनात आपल्याला जे हवे असते ते सहज मिळत नाही. परंतु खरे पाहता सत्य हेच आहे की, आपल्याला तेच हवे असते, जे सहज मिळू शकत नाही. शेवटी प्रयत्न चालू ठेवावेत, हेच सत्य आहे. कधी तरी यश आपल्या पदरात पडणार, याची खात्री असावी. नैराश्य आले की फुलांच्या दुकानासमोर उभे राहा.

चाफा फुलतो तेव्हा त्याच्या वासाचा दरवळ लांबपर्यंत पसरतो. म्हणजे चाफा कुठे आहे, हे शोधता येते. काही जण रुमालात, मनात चाफा ठेवतात. तसेच मोगऱ्याचे आहे- फुले काय किंवा गजरा काय, ओंजळीत धरले की घमघमाट सुटतो. वासाने बेधुंद व्हायला होते. अबोली, सदाफुलीला वास नसतो. पण आकर्षक रंगामुळे त्यांचे महत्त्व वेगळेच आहे. बकुळीची फुले वहीत ठेवली; तर कित्येक दिवस वही सुगंधित होते. भारतात इतकी नाना तऱ्हेची फुले असून ती सर्वानाच आनंदी करतातच; पण काहींचा वास दु:ख दूर करून मन आनंदी करतात.

..तेव्हा फूल पायाखाली आले; तर त्याला तुडवू नका; तर प्रेमाने उचलून झाडाच्या मुळशी टाका. त्यांचे चार-पाच दिवसांचे आयुष्य असले; तरी ती कोणालाही दुखवत नाहीत. मग मानवाने फुलांपासून काहीच शिकू नये का?
रेखा केळकर – response.lokprabha@expressindia.com