सध्या देशातले वातावरण लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने व्यापले आणि तापलेही आहे. देशभरात काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार लढत रंगणार आहे आणि तिला दिल्लीचा प्रयोग फसूनही ‘आम आदमी पक्षा’चीही किनार आहे. महाराष्ट्रात तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बडय़ा मोहऱ्यांबरोबरच आम आदमी पक्ष, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, डावे आणि रिपब्लिकन गट असे लहान-मोठे पक्षही रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे अनिश्चितता हाच या निवडणुकीतला निश्चित मुद्दा ठरला आहे. राजकारणाकडे गांभीर्याने पाहणाऱ्या मतदारांच्या मनात त्यामुळेच अनेक प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या आहेत. त्यावर उत्तरे शोधण्याची थेट संधी आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर ऑनलाइन ‘लाइव्ह चॅट’च्या माध्यमातून वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.
आज गुरुवार, ३ एप्रिलला दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत वाचक  indianexpress-loksatta.go-vip.net या संकेतस्थळावर येऊन ‘चॅट’मध्ये सहभागी होऊ शकतात. वाचकांना त्यांचे प्रश्न विचारण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर एक दालन या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे मोजक्या शब्दांत वाचकांनी आपला प्रश्न आणि नाव द्यायचे आहे. प्रत्येक प्रश्न प्रथम तपासला जाईल आणि मुद्देसूद, योग्य प्रश्नाला गिरीश कुबेर तात्काळ उत्तर देतील. त्यानंतर तो प्रश्न आणि उत्तर या दालनात लगेच प्रसिद्धही केला जाईल. वाचकांनी पाठविलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे ‘लाइव्ह चॅट’ संपल्यानंतरही संकेतस्थळावर वाचता येतील.
या ‘लाइव्ह चॅट’मध्ये सहभागी होण्यासाठी लॉग इन करा indianexpress-loksatta.go-vip.net