लोकसभेसाठी मतदान सुरू होण्यापूर्वीच माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान ठार झाले, तर अन्य तीन जखमी झाले आहेत़  बिहारमधील जामुई लोकसभा मतदारसंघाच्या दिशेने हे जवान जात असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास माओवाद्यांनी स्फोटकांच्या साहाय्याने हा हल्ला केला, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली़ सीआरपीएफ आणि बिहार पोलिसांचा चमू दोन जीपमधून प्रवास करीत होता़  वाटेतील सवालाख बाबा मंदिराजवळील पुलावर माओवाद्यांनी आयईडी स्फोटके पेरून ठेवली होती, असे खारंपूरचे पोलीस उपाधीक्षक रंजन कुमार यांनी सांगितल़े  
झारखंडमध्येही माओवाद्यांकडून स्फोट
रांची : लोकसभेसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी लाटेहार जिल्ह्यातील जंगलांनी वेढलेल्या भागात  माओवाद्यांनी स्फोट मालिका घडविल्या़  गुरुवारी पहाटे चत्रा लोकसभा मतदारसंघातील या भागात गोळीबारही केला़  सुदैवाने या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही़