आम आदमी पक्षाकडून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले अभिनेते जावेद जाफरी यांनी ‘आम आदमी’ मतदारांना ‘सब चलता है, सब बिकता है’ या रॅप गाण्याने साद घालण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेले हे रॅप गाणे देशातील विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करते. घोटाळे, भ्रष्टाचार आणि फुटीरतावादी राजकारण या मुद्द्यांना हाताशी धरून जावेद जाफरी यांनी राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे.
गाण्याच्या पार्श्वभूमीवर एकामागून एक विविध मुद्द्यांना अनुसरून चलचित्र सुरू असते यात भागलपुरमधील दंगल, बोफोर्स घोटाळ्यापासून ते गुजरात दंगल आणि अयोध्येच्या मुद्दयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर तेलंगणामुद्द्यांवरून संसदेत झालेल्या अभुतपूर्वक गोंधळाच्या व्हिडिओवरून राजकारणाच्या भयाण रूपावर जाफरी यांनी या गाण्यातून टीका केली आहे. त्याचबरोबर कोलगेट घोटाळा, चारा घोटाळा तसेच आयपीएल फिक्सिंगपासून टू-जी आणि कॉमनवेल्थ गैरव्यवहारप्रकरावर भाष्य करणाऱया या रॅप गाण्यावरून ‘आम आदमी’ने जागृत होऊन ‘आप’ला मतदान करण्यासही जावेद जाफरी आवर्जून सांगताना दिसतात 
व्हिडिओ-