• गोव्यात मुसळधार पावसामुळे भाताच्या पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोव्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे.
  • पावसामुळे जमिनी पाण्याखाली गेल्या असून त्याचा परिणाम भातशेतीवर होणार असल्याचे राज्य कृषी विभागाने सांगितले आहे.
  • पुढील दोन दिवसांत पाऊस ओसरला तरच भातशेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अन्यथा मोठय़ा प्रमाणात नुकसान सोसावे लागणार असल्याचे राज्य कृषी विभागाचे संचालक उल्हास काकोडे यांनी सांगितले.
  • गोव्यात मोसमी पावसाच्या कालावधीत सुमारे २८ हजार हेक्टर जमिनीवर भातशेती केली जाते.
  • गोव्यातील ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात भातशेती केली जाते.
  • हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे सांगितले आहे. तसेच या पावसामुळे पाऊस झाल्यास पुराचा धोका निर्माण होईल, असे सांगितले आहे.
  • तसेच पीक विमा योजनेत विविध बँका, विमा कंपन्या, सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या मदतीबाबतही तपासणी करण्यात येणार आहे.

कॅगपीक विमा योजनेची तपासणी करणार

  • नियंत्रक महालेखापरिक्षक (कॅग) नऊ राज्यांतील पिक विमा योजनेची तपासणी करणार आहे. पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा कितपत लाभ हे ‘कॅग’कडून तपासण्यात येणार आहे.
  • कृषी साहाय्यक विभाग, कृषी विमा संस्था आणि राज्य कृषी हे विभाग महालेखापरिक्षकांना मदत करणार आहेत.
  • महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तेलंगण या नऊ राज्यांत विमा योजनेची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती रिझव्‍‌र्ह बँकेने दिली आहे.