Mehendi Designs For Diwali 2023 : दिवाळीनिमित्त सर्वत्र गजबज पाहायला मिळते आहे. कंदील, पणत्या, नवनवीन कपडे आदी गोष्टींनी मार्केट सजले आहे. १२ नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या दिवाळीचा पहिला दिवस आहे. दिवाळीनिमित्त तरुणी, स्त्रिया, महिला महाराष्ट्रीयन लूकमध्ये तयार होतात. यादरम्यान लूकची शोभा वाढवण्यासाठी हातावर मेंदी काढली जाते. प्रत्येक सणाला हातावर मेंदी काढण्याची जणू फॅशनच झाली आहे. दिवाळीनिमित्त तुम्हीही हातावर मेंदी काढण्याचा विचार करीत असाल, तर या खास डिझाईन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत; ज्या तुम्ही हातावर काढून बघा आणि तुमच्या लूकची शोभा वाढवा…

दिवाळीनिमित्त हातावर मेंदी काढण्यासाठी नक्की ट्राय करा या खास ‘पाच’ डिझाइन्स :

How to clean Cooler at home
Jugaad Video: कुलर सुरु करण्याआधी ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; मिनिटांत होईल तुमचा कुलर स्वच्छ, कुबट वास येणार नाही!
Hyderabad man’s support empowers house help
गुलाबी सायकल अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद! स्वयंपाकीण ताईचे कष्ट वाचवण्यासाठी व्यक्तीने केली खास मदत, Viral Video
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
diy best safe summer travel tips and tricks health tips for summer vacation
उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंबासह फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग जाताना ‘या’ चार गोष्टी आठवणीने बरोबर घ्या

१. तळहातासाठी मेंदी डिझाईन :

पंजाबी, चुडीदार ड्रेस तुम्ही दिवाळीत घालणार असाल, तर तुम्ही फक्त तळहातापर्यंत बेसिक (Basic Mehendi) काढा आणि तुमच्या हाताची व लूकची शोभा वाढवा.

२. हातभर मेंदी डिझाईन :

जर तुम्ही दिवाळीत ऑफिसमध्ये किंवा दिवाळीच्या पहिल्या दिवशी मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला जाताना साडी नेसणार असाल, तर तुमच्या हातावर तुम्ही हातभर मेंदी (Full Hand Mehendi Design) हमखास काढू शकता. बोटांपासून ते अगदी हाताच्या कोपरापर्यंत मेंदी काढायची असल्यास तुम्ही या डिझाईनचा नक्की उपयोग करू शकता.

३. आधुनिक मेंदी डिझाईन (Back Hand Mehendi Design) :

जर तुम्ही दिवाळीत कुर्ता-लेगिंग घालायचा विचार करीत असाल, तर त्यावर ही चक्र, फुले, झुमके आणि खास नक्षीकाम करण्यात आलेली आधुनिक मेंदी डिझाईन तुमच्या पोशाखावर शोभून दिसेल.

४. पारंपरिक डिझाईन :

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेक सार्वजनिक ठिकाणी पूजेचे आयोजन केले जाते. यादरम्यान तुम्ही महाराष्ट्रीयन लूक करून पारंपरिक मेंदी काढू शकता. मेंदीमधील पारंपरिक डिझाईनसाठी अनेक खास गोष्टी चित्रित केल्या जातात. हातावर डिझाईनमध्ये गोल वर्तुळाकार चक्र, प्राणी, फुले, झुमके आणि खास नक्षीकाम अशा डिजाईन काढण्यात येतात. जर तुम्हाला पारंपरिक मेंदी काढायची असेल, तर तुम्ही नक्की या डिझाईनचा वापर करू शकता.

५. कॉम्बिनेशन मेंदी (Combination Mehendi) :

दिवाळीत भाऊबीजला शॉर्ट कुर्ती आणि जीन्स घालायचा तुम्ही विचार करीत असाल, तर या पोशाखावर जाणारी ही कॉम्बिनेशन मेंदी तुम्ही काढू शकता; ज्यात फुले आणि ग्रिड यांचा समावेश असतो. अशा डिझाईन काढून तुम्ही तुमच्या लूकची शोभा वाढवू शकता.

या मेंदी डिजाईन सोशल मीडियावरील @artistic_mehendiii यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आल्या आहेत. दिवाळीनिमित्त प्रत्येक दिवशी तुमच्या पोशाखाच्या प्रकारानुसार अशा खास मेंदी काढा आणि तुमच्या हाताची व तुमच्या पारंपरिक लूकची शोभा वाढवा.