अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली तारापूर औद्योगिक क्षेत्रात सुमारे १५ हजार कामगार

बोईसर : बोईसरमध्ये करोना विषाणूचे चार रुग्ण आढळून आल्याने टाळेबंदीविषयक नियमांचे कठोर पालन करणे गरजेचे आहे. मात्र, औद्य्ोगिक क्षेत्रातील कारखान्याला अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली व सलग उत्पादन प्रक्रिया सुरु ठेवण्यासाठी परवानगी देऊन या ठिकाणी १२ ते १५ हजार कामगार कोणत्याही प्रकारची विषेश सुरक्षा पाळता काम करत आहेत.

तारापुर औद्य्ोगिक क्षेत्रातील औषध निर्मिती कारखाने, औषधांसाठी लागणारा कच्चा माल निर्मिती करणार्म्या कारखान्यांना 25 टक्के कामगार घेवून कारखाने चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. काही रासायनिक कारखान्यांनी देखील आपण अत्यावश्यक सेवा देणारी उत्पादन बनवतो अशी दिशाभूल करणारी माहिती देऊन कारखाने सुरू करण्याच्या परवानग्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आल्या आहेत.

मात्र याठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक कामगार कामावर बोलवले जात असताना देखील याकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही. कारखान्यात काम करत असताना कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे.

येथील विराज प्रोफाइल कारखान्याला अत्यावश्यक सेवेसाठी लागणारी उत्पादन बनविली जातात अशी बतावणी करून तसेच इस्पात मधील उत्पादने सलग उत्पादन प्रक्रियेअंतर्गत येत असल्याचे कारण सांगून कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी घेतल्याचे सांगितले जात आहे. या कंपनीनें करोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजना आमलात न आणल्याने हा कारखाना काही दिवस बंद करण्यात आला होता. मात्र काही नियम व अटी लावुन कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली.

औद्य्ोगिक क्षेत्रातील सुमारे ३५० कारखाने अत्यावश्यक सेवेतील उत्पादन करीत असल्याचे कारण देत त्यांना सुरू ठेवण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. कारखाने सुरू झाल्यानंतर याठिकाणी बोईसर पोलिसांन कडुन वाहनांना व कारखान्यात येणारम्य़ा हजारो कामगारांना परवानगी देण्यात आली. यामुळे औद्य्ोगिक क्षेत्रात १२ ते १५ हजार कामगार रोज प्रवास करत असुन यामधील काही अधिकारी व कामगार पालघर बाहेरून प्रवास करून येतात. जिल्हाधिकारी यांनी फक्त परवानगी देत कारखाने सुरू झाले मात्र कारखान्यात खरच कामगार सुरक्षित आहेत का, या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.