News Flash

विसर्जनादरम्यान चौघांचा मृत्यू

विसर्जनाच्या दरम्यान विदर्भात पवनी, अकोट आणि उमरखेड येथे एकूण चौघांचा बुडून मृत्यू झाला.

पवनीत २, आकोट व उमरखेडमध्येही १ बुडाला
विसर्जनाच्या दरम्यान विदर्भात पवनी, अकोट आणि उमरखेड येथे एकूण चौघांचा बुडून मृत्यू झाला. त्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
भंडारा जिल्ह्य़ातील पवनी तालुक्यातील वलनी येथे गणेश विसर्जनादरम्यान रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. समीर जनबंधु (१२) व गौरव मेश्राम (११,दोघेही रा. वलनी) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून मृतदेहांचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, उमरखेड येथेही एका सोळा वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. अकोला जिल्ह्य़ात अकोटजवळील पोपटखेड धरणावर विसर्जनासाठी गेलेल्या सिध्देश्वर इंगळे या तरुणाचाही बुडून मृत्यूू झाला. तो बुलढाणा जिल्ह्य़ातील मोताळाचा राहणारा असून अकोटला नातेवाईकांकडे आला होता. विसर्जनासाठी धरणावर आल्यानंतर तो कुणालाच न दिसल्याने तो गाळात फसला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2015 3:15 am

Web Title: 4 drown during ganesh visarjan
टॅग : Ganesh Visarjan
Next Stories
1 जुलैमध्ये मंजूर झालेल्या कामांच्या निविदा मार्चमध्येच कशा निघाल्या?
2 यवतमाळ २ खुनांच्या घटनांनी हादरले
3 नागपूरच्या राजाचे जल्लोषात विसर्जन
Just Now!
X