News Flash

नगरच्या कुमुदिनीला भुईकोट किल्लय़ात मानाचे स्थान!

निम्फिया स्काय जय’ ही कुमुदिनी यापुढे या ऐतिहासिक कुंडाची शोभा वाढविणार आहे.

नगर : येथील निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम श्रीरंग सातपुते यांनी कृत्रिम परागीभवन प्रक्रियेतून विकसित केलेल्या ‘निम्फिया स्काय जय’ या कुमुदिनीच्या नवीन प्रजातीला भुईकोट किल्लय़ात मानाचे स्थान दिले आहे. अमेरिकेतील इंटरनॅशनल वॉटर गार्डनिंग सोसायटी (आयडब्ल्युजीएस) या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांच्या या नवीन प्रजातीला काही दिवसांपूर्वी मान्यताही दिली आहे.

भुईकोट किल्लय़ाच्या विकास कामाच्या वेळी केल्या गेलेल्या उत्खननात अतिशय पुरातन व भव्य दगडी कुंड सापडला होता. हा ऐतिहासिक कुंड भुईकोट किल्लय़ाच्या अगदी मध्यभागी लष्कराच्या मुख्य कार्यालयाजवळ ठेवण्यात आलेला आहे. काही वर्षांपासून हा कुंड रिकामाच होता. नगरमध्ये कृत्रिम परागीभवनातून जन्माला घातलेली कुमुदिनीची ही नवीन प्रजाती म्हणजे, नगर शहराचा सन्मान आहे, असे मत व्यक्त करत लष्करातील पुरवठा डेपोचे प्रमुख मेजर उदयनप्रकाश ठाकुर यांच्या संकल्पनेने या ऐतिहासिक कुंडात ‘निम्फिया स्काय जय’ या नगरच्या कुमुदिनीचे रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार  उदयनप्रकाश ठाकुर यांच्या हस्ते या कुंडात नुकतेच या कुमुदिनीचे रोपण करण्यात आले. ‘निम्फिया स्काय जय’ ही कुमुदिनी यापुढे या ऐतिहासिक कुंडाची शोभा वाढविणार आहे. यावेळी जयराम सातपुते यांच्यासह कॅप्टन करन सगवान, स्वीय सहायक सुबेदार साहबसिंग यादव, माजी सैनिक श्रीरंग सातपुते, ‘स्वागत अहमदनगर’ चे अमोल बास्कर, पंकज मेहेर, छायाचित्रकार सूरज कपाळे, आण्णा बनसोडे आदी उपस्थित होते.

निसर्ग अभ्यासक सातपुते यांनी त्यांच्या भिंगारमधील निवासस्थानी विविध प्रकारची, रंगांची कमळे व कुमुदिनी फुलवली आहे. सातपुते हे पक्षिप्रेमीही असून विद्यार्थ्यांमध्ये पक्षिनिरीक्षणाची भावना रुजवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:08 am

Web Title: ancient stone tank discovered during excavation in bhuikot fort zws 70
Next Stories
1 नीहार भावेच्या लघुपटास राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकासह एक लाखांचे बक्षीस
2 टाळेबंदीचा गैरफायदा घेत अनधिकृत मोबाइल टॉवर उभारणी
3 केंद्राने पुरवठा केल्यानेच महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण
Just Now!
X