03 March 2021

News Flash

बीड : वरिष्ठ अधिकाऱ्याने अंगणवाडी सेविकांच्या ग्रुपवर टाकला स्वतःचा नग्न फोटो

बालविकास विकास विभागाच्या उपायुक्त चौकशीसाठी दाखल

महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने स्वतःचा नग्न फोटो महिला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर पोस्ट केला. या प्रकाराने खळबळ उडाली असून अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही अधिकाऱ्याने असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारी आहेत. याप्रकरणाच्या चौकशीसाठी बालविकास विभागाच्या उपायुक्त गुरुवारी सकाळी बीडमध्ये दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीड येथील महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने बुधवारी चक्क महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा आंघोळ करतानाचा नग्न फोटो पोस्ट केला. या प्रकारामुळे गोंधळ उडाला असून महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पूर्वीही या अधिकाऱ्यानं त्याचे प्रायव्हेट फोटो ग्रुपवर शेअर केल्याची तक्रार महिलांनी केली होती.

‘बीड आयसीडीएस अर्बन ‘नावाच्या फक्त महिलांच्या ग्रुपवर अधिकाऱ्यांचा स्वत:चा असा फोटो पोस्ट करून चावटपणा केला आहे. या प्रकारामुळे अनेक महिला ग्रुपमधून बाहेर पडल्या. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान गुरुवार दि. 23 जुलै रोजी बालविकास विभागाच्या उपायुक्त बीड येथे दाखल झाल्या असून दुपारी सदरील अधिकाऱ्याची चौकशी सुरू होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:40 pm

Web Title: anganwadi whats up group nude photo send senior officer in beed nck 90
Next Stories
1 “संभाजी भिडे यांच्याकडून सांगली-सातारा बंदची अद्याप घोषणा नाही”; संजय राऊत यांचा टोला
2 अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाची गरुडझेप; MPSC च्या तीन पदांवरती निवड
3 “शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवतेय”
Just Now!
X