15 January 2021

News Flash

ठेवीदारांना १० हजारांपर्यंतच्या ठेवी परत घेण्याचे आवाहन

पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या १० हजारांच्या आतील ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना त्याचे पसे

पेण अर्बन बँक प्रकरण
पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या १० हजारांच्या आतील ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना त्याचे पसे परत करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र १ लाख ३४ हजार ठेवीदारांपकी केवळ ११ ते १२ हजार ठेवीदारांना आत्तापर्यंत आपल्या ठेवी परत करण्यात आल्या आहे. त्यामुळे ज्या ठेवीदारांनी आपल्या १० हजारांपर्यंतच्या ठेवी परत घेतल्या नाहीत त्यांनी तातडीने जवळच्या शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
ज्या ठेवीदारांच्या खात्यांची एकूण रक्कम १० हजार रुपये (मुद्दल) किंवा त्यापेक्षा कमी असेल अशा ठेवीदारांना ठेवीचे वाटप धनादेशाद्वारे बँकेच्या शाखांमधून करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २० ऑगस्ट २०१५ ला दिले आहेत. या आदेशानुसार ठेवी वितरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र दोन महिन्यांत १८ कोटींपकी जवळपास साडेपाच हजार कोटींचे आजवर वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या ठेवीदारांनी आत्तापर्यंत आपल्या ठेवी परत घेतलेल्या नाहीत, त्यांनी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँक व्यवस्थापनाने केले आहे. आपले के. वाय. सी. नॉम्र्स उदा. आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, इत्यादीपकी एक, ठेवीदार मयत असल्यास दाखला, प्राधिकृत अधिकाऱ्याचे वारसाचे प्रमाणपत्र, इन्डेम्निटी बॉण्ड, अज्ञान असल्यास जन्मतारखेचा दाखला, कंपनी/ भागीदारी फर्म असल्यास फर्मचा ठराव, प्रोप्रायटरी फर्मसाठी अत्यावश्यक कागदपत्रे, ट्रस्ट, सहकारी सोसायटी यांचे ठराव, संयुक्त खाते असल्यास सह खातेदारांची संमतीपत्रे, ठेव पावती हरवली असल्यास एफ.आय.आर., इन्डेम्निटी बाँड इत्यादी कागदपत्रे, मुदत ठेव खात्यांची ठेव पावती शाखेत जमा करावी व आपली ठेव रक्कम प्राप्त करावी. जे पात्र ठेवीदार के.वाय.सी. नॉम्र्सची पूर्तता करणार नाहीत त्यांची ठेव रक्कम देता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
तसेच १० हजार रुपयांच्या आतील ठेवीदारांना विनंती करण्यात आली की, त्यांनी संबंधित शाखेतून बँकेचे कार्यालयीन वेळेत धनादेश स्वीकारावेत. ज्या ठेवीदारांची इतर शाखांमध्ये खाती असतील त्यांनी त्यांचे ठेव ज्या शाखेत जास्त असेल त्या शाखेशी संपर्क साधावा. आपली ठेव रक्कम शांततामय मार्गाने स्वीकारून व्यवस्थापनास सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2015 12:24 am

Web Title: bank announce to take return money
टॅग Money
Next Stories
1 जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीवर लोकप्रतिनिधींचा बहिष्कार
2 वैभववाडी नगरपंचायतीत काँग्रेसचा स्वतंत्र गट
3 काशिद समुद्रकिनारी पुण्यातील दोन मुले बुडाली
Just Now!
X