28 February 2021

News Flash

VIDEO: मोटरसायकलसोबत चालकाचीही टोईंग व्हॅननं काढली परेड, पुण्यातला प्रकार

बाईकसोबत चालकालाही टो केल्याचं आजपर्यंत तुम्ही कधी पाहिलं नसेल. पण पुण्यात असा विचित्र प्रकार पहायला मिळाला आहे.

नो पार्किंगमध्ये उभी असलेली बाईक टो होताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण बाईकसोबत चालकालाही टो केल्याचं आजपर्यंत तुम्ही कधी पाहिलं नसेल. पण पुण्यात असा विचित्र प्रकार पहायला मिळाला आहे. नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बाईकला टो करताना कर्मचाऱ्यांनी चालकासोबतच बाईकला टो केलं. हा सर्व प्रकार तिथे उपस्थित एका व्यक्तीने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विमाननगरमधील लुंकड प्लाझासमोर हा प्रकार घडला आहे. दुचाकीस्वाराने नो पार्किंगमध्ये आपली बाईक उभी केली होती. यावेळी टोईंग व्हॅन नो पार्किंमधील बाईकवर कारवाई करत करत होती. यावेळी नो पार्किंगमध्ये बाईक पार्क करुन बसलेल्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी बाईकसहित टो केलं. विशेष म्हणजे हे सर्व वाहतूक पोलिसासमोर सुरु होतं. ३० मे रोजी ही घटना घडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 11:34 am

Web Title: bike owner tow with bike in pune
Next Stories
1 मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण पुण्यात सर्वाधिक
2 ६ ते ८ जूनदरम्यान मोसमी पाऊस राज्यात
3 राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच समाजमाध्यमांमध्ये?
Just Now!
X