News Flash

“वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही,” चित्रा वाघ यांचं ट्वीट चर्चेत

"सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू," चित्रा वाघ यांचा आरोप

“वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही,” चित्रा वाघ यांचं ट्वीट चर्चेत

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेल्या टीकेला भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे. मेहबूब शेख यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेवर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला असून वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही अशा शब्दांत उत्तर दिलं आहे. चित्रा वाध यांनी ट्विट केलं असून सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले; आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू असल्याचा आरोप केला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे –

“वाघावर कोल्हे, कुत्रे भुंकत आहेत. कारण मी पीडितांच्या पाठीशी उभी राहते म्हणून. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू. मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही,” असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी टीकेला उत्तर दिलं आहे.

मेहबूब शेख यांनी निलेश लंके यांच्यावर केलेल्या टीकेवरुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला होता. “चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, असं ते म्हणाले होते. पारनेर तालुक्यातील कार्यक्रमात ते बोलत होते. लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे असंही यावेळी ते म्हणाले होते.

तसंच यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांना आधी तुमच्या नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, नंतर आम्हाला शिकवा असा सल्ला देताना तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते अशी आठवण करुन दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 12:15 pm

Web Title: bjp chitra wagh tweet over ncp mehboob sheikh sgy 87
Next Stories
1 राजकारण करत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर; म्हणाले, “आधी आपल्या…”
2 “तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीतही तुम्हाला विरोधी बाकांवरच बसावं लागणार आहे”; संजय राऊतांचा मुनगंटींवारांना टोला
3 “सत्तेसाठी नव्हे तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी…”; देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर संतापले
Just Now!
X