News Flash

उद्योजक बाळासाहेब पवार यांची गोळी झाडून आत्महत्या

बाळासाहेब यांच्या पार्थिवावर रात्री अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक ज्ञानदेव उर्फ बाळासाहेब रामचंद्र पवार

ओम उद्योग समूहाचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक ज्ञानदेव उर्फ बाळासाहेब रामचंद्र पवार यांनी आज, शनिवारी सकाळी स्वत:कडील रिव्हॉलव्हरने डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सून व जावई असा परिवार आहे. बाळासाहेब यांच्या पार्थिवावर रात्री अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणालाही मदतीसाठी सदैव तत्पर अशी बाळासाहेबांची ख्याती होती.

आज सकाळी पुणे रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात त्यांनी आत्महत्या केली. त्यांना तातडीने जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाले. त्यांच्या खिशात ‘आपण आत्महत्या करत असल्या’ची चिठ्ठी आढळली. त्यात ‘आपण आता कोणालाही पैशाचे देणे लागत नाही, सर्वाचे पैसे दिले आहेत’, असेही चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे, त्यानुसार कोतवाली पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पवार यांच्याकडे रिव्हॉलव्हरचा परवाना होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दिली. पवार यांच्या आत्महत्येने त्यांच्या मोठय़ा मित्रपरिवाराला मोठाच धक्का बसला.

बाळासाहेब मढी देवस्थान ट्रस्टचे माजी कोषाध्यक्ष, जिल्हा पेट्रोलपंप चालक संघटनेचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघाचे ते शहराध्यक्ष, जिल्हा सायकलिंग संघटनेचे उपाध्यक्ष, शिवशंभो प्रतिष्ठानचे स्वागताध्यक्ष होते. मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मराठा समाजाचे वधू-वर सुचक मेळावे आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार होता. कोणी अडचणीत असलेल्याची माहिती मिळताच ते धावून जात. मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. बाळासाहेबांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ विविध सामाजिक उपक्रम राबवले. बाळासाहेबांना खेळाडूंबद्दल विशेष आपुलकी होती. क्रीडा संघटनांच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी तसेच या स्पर्धासाठी ओम गार्डन कार्यालय ते सवलतीच्या दरात उपलब्ध करत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 3:34 am

Web Title: businessman balasaheb pawar commit suicide by shooting self
Next Stories
1 शेती यांत्रिकीकरणाचा आतबट्टय़ाचा व्यवहार!
2 साईभक्तांना रेल्वे अद्ययावत सुविधा देणार – गोयल
3 सांगली महानगरपालिका सभेत नगरसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X