21 September 2020

News Flash

फलटणमध्ये शरद पवारांसमोरच शेखर गोरेंच्या समर्थकांचा गोंधळ

पवार यांच्यासमोरच गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने खळबळ उडाली आहे.

शेखर गोरे यांच्या समर्थकांनी शरद पवार यांचे भाषण सुरू असतानाच स्टेजवर जाऊन त्यांना रोखत आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला.

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार हे स्वत: निवडणुकीस उभे राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर फलटण येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मा शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्यात आला. पवार यांचे भाषण सुरू असतानाच हा गोंधळ झाल्याने एकच खळबळ उडाली. गोरे हे पवार यांचे भाषण सुरू असतानाच मंचावर गेले आणि त्यांनी पवारांना रोखत त्यांचे म्हणणे मांडण्यास सुरूवात केली. गोरे यांच्या या प्रकारासमोर सर्वचजण हतबल झाल्याचे दिसले. दरम्यान, गोरे यांनी हा अंतर्गत वाद असून माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादीत सक्रिय झालेले प्रभाकर देशमुख यांच्याबाबत आक्षेप नोंदवला आहे.

गोरे यांनी प्रभाकर देशमुख यांच्याबद्दल आक्षेप नोंदवला. गोरे यांच्याबद्दल आपल्याला कुठलीच अडचण नाही. पण त्यांनी पक्षाच्या अंतर्गत राजकारणात पडू नये, असे मत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. हा अंतर्गत वाद आहे. मला पवारसाहेबांपर्यंत पोहोचू दिले जात नाही. पक्षाचे आदेश मला सांगितले जात नाहीत. पवारसाहेबांबाबत मला आदर आहे. पण प्रभाकर देशमुख यांनी अंतर्गत राजकारणात पडू नये, असेही गोरे यांनी म्हटले.

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचे शेखर हे भाऊ आहेत. मध्यंतरी शेखर गोरे यांच्यावर तडिपारीची कारवाई करण्यात आली होती. नंतर ही कारवाई मागे घेण्यात आली. शेखर गोरे यांच्या या कृत्यावर राष्ट्रवादीकडून कारवाई केली जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 1:41 pm

Web Title: chaos in ncp president sharad pawars speech in phaltan by shekhar gores worker
Next Stories
1 औरंगाबादमध्ये महिलेला विवस्त्र करुन मारहाण, कपडे देण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांची अडवणूक
2 तुम्ही माढ्याच्या मागे का लागलात, शरद पवार यांचा सवाल
3 ५६ इंच छाती केवळ भाषणापुरतीच, सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका
Just Now!
X