मंत्रिमंडळाचे निर्णय जनतेच्या हितासाठी घेतले जातात, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी ‘आदर्श’ घोटाळ्याचा अहवाल फेटाळण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे. त्याचे कारण सांगता येणार नाही, असे स्पष्ट केले.
‘आदर्श’ घोटाळा: अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राजेश टोपे, सुनील तटकरे यांच्यावर ताशेरे
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. अधिवेशन संपल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये चव्हाण यांनी अधिवेशनाच्या काळात झालेल्या कामकाजाची माहिती दिली. यानंतर पत्रकारांनी आदर्श अहवाल फेटाळण्याबद्दल विचारल्यावर चव्हाण म्हणाले, मंत्रिमंडळाचे निर्णय जनतेच्या हितासाठी घेतले जातात. आदर्श घोटाळ्याचा चौकशी अहवाल कृती अहवालासह विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला आहे. ‘आदर्श’ची जमीन ही राज्य सरकारचीच आहे, हे अहवालातून स्पष्ट झाले. अहवालाचा दुसरा भाग मात्र मंत्रिमंडळाने फेटाळला आहे. त्याचे कारण सांगता येणार नाही.
घोटाळ्याचा ‘आदर्श’ प्रवास..