कंटेनर उलटल्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रांजोळी जंक्शनजवळील ओवळी गावाजवळ कंटेनर उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

स्टेअरिंग लॉक झाल्याने कंटेनर उलटल्याची माहिती मिळत असून रस्त्यावर सर्वत्र काचांचा खच पडल्याचं समजतंय. दरम्यान, अग्निशमन दलाचीही एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून पाइपलाइन रोड अथवा खारेगाव टोल-मुंब्रा बायपास-कल्याण मार्ग वापरण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.